Punjab Gangster Sukha Duneke Killed In Canada: पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याची कॅनडात हत्या

पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके (Sukhdool Singh aka Sukha Duneke) याची आणि त्याच्या साथीदारांचा प्रतिस्पर्धी टोळीसोबत संघर्ष उडाला. यात बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसर, ही घटना कॅनडातील (Canada) विनिपेग (Winnipeg City) शहरात घडली.

Gangster Sukha Duneke | (Photo Credits: X)

Khalistani Terrorist in Canad: पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके (Sukhdool Singh aka Sukha Duneke) याची टोळीयुद्धात हत्या झाल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सुखदूर आणि त्याच्या साथीदारांचा प्रतिस्पर्धी  टोळीसोबत संघर्ष उडाला. यात बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसर, ही घटना कॅनडातील (Canada) विनिपेग (Winnipeg City) शहरात घडली. विविध गुन्ह्यांसाठी तो भारतीय पोलिसांनाही हवा होता. सन 2017 मध्ये हा गुंड बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतातून कॅनडाला पळून गेला होता. त्याच्यावर आतापर्यंत किमान 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सांगितले जात आहे की, सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याची हत्या दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येशी मिळतीजुळती आहे. प्रतीस्पर्धी गटाने त्याच्यावर 15 गोळ्या झाडल्या. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ट्विट

पंजाबमध्ये पाठीमागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी बोकाळली आहे. त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत पोलीस प्रशासन आणि सरकारसमोरही आव्हान आहे. दरम्यान, देशांतर्गत आणि राज्यांतर्गत कारवाई टाळण्यासाठी हे गुन्हेगार देशाबाहेर आश्रय शोधत असतात. ज्यासाठी ते बनावट कागदपत्रांचा आधार घेतात.

ट्विट

पंजाब आणि संबंध भारतातीलही अनेक गुंड, गँगस्टर, माफीया यांनी देशाबाहेर विविध देशांमध्ये आश्रय घेतला आहे. प्राप्तमाहितीनुसार सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याने बनावट प्रवासी कागदपत्रांद्वारे किंवा पूर्वी नेपाळ मार्गाने भारतीय पासपोर्टवर भारत सोडला, असा संशय आहे.

ट्विट

दरम्यान, वृत्तसंस्था एएनआयने 'X' वर मोगा येथी गँगस्टर सुखदूर सिंह याच्या घरासमोरील दृश्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही पोलीस काही कारवाई करताना दिसत आहे. याच व्हिडिओच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्याचा (सुखदूर) कॅनडातील विनिपेग येथे एका टोळीतील गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे परंतु अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, राज्य पोलिसांकडून संपूर्ण पंजाबमध्ये गुंड आणि खलिस्तानी घटकांविरुद्ध धाडसत्र सुरु आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now