Punjab Crime: पंजाब शहर हादरलं, पाळीव कुत्र्यासह आई आणि मुलीची केली हत्या; आरोपीने स्वत: संपवले आयुष्य
एका व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी बंदुकीने आपल्या जन्मदात्या आई, मुलगी आणि पाळीव कुत्र्याची हत्या केली आहे.
Punjab Crime: पंजाब येथील बर्नाला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी बंदुकीने आपल्या जन्मदात्या आई, मुलीची आणि पाळीव कुत्र्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रामराज कॉलनीत ही घटना घडली आहे. रविवारी पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. (हेही वाचा-नवी मुंबईत पोलिस उपनिरीक्षकाकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार, गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, कुलबीर मान सिंग असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सर्व प्रथम त्याने २१ वर्षीय त्याच्या मुलीची गोळी घालून हत्या केली. निम्रत कौर असं तरुणीचे नाव होती. त्यानंतर वृध्द आईला गोळी घालून ठार केले आहे. बलवंत कौर (85) असं आईचे नाव होते. आईच्या हत्येनंतर त्याने पाळीव कुत्र्याला मारत स्वत: आत्महत्या केली अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून चार जणांचे मृतदेह ताब्यात घेतले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. शेजारच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुलबीर हा गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता. कुलबीर यांची मुलगी नुकतीच कॅनेडातून भारतात परतली होती. या घटनेनंतर संपुर्ण शहर हादरले आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.