Priyanka Gandhi on Rahul Gandhi: 'मी माझ्या भावासाठी बलिदान देऊ शकते', प्रियंका गांधी यांचे बंधु राहुल यांच्याबद्दल उद्गार

माझ्या भावासाठी मी माझ्या जीवाचे बलीदान देऊ शकते आणि माझ्यासाठी तोही असे करु शकतो, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

Priyanka Gandhi (Photo Credit: Twitter/ANI)

काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी बंधू राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल अत्यंत भावूक उद्गार काढले आहेत. माझ्या भावासाठी मी माझ्या जीवाचे बलीदान देऊ शकते आणि माझ्यासाठी तोही असे करु शकतो, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. संघर्ष भाजपमध्ये आहे काँग्रेसमध्ये नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामध्ये हितसंबंध असू शकतात, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election 2022) त्यांनी भाजपवर प्रचारादरम्यान जोरादर निशाणा साधला

प्रियंका गांधी यांनी आम आदमी पक्षावरही जोरदार टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या. आम आदमी पार्टी RSS मधून उदयास आली आहे. दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्यसेवा संस्थांच्या नावावर काहीही नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पाठीमागील 5 वर्षांपासून पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. हे सरकार पंजाब नव्हे तर दिल्लीमधून काँग्रेस नव्हे तर भाजपद्वारे चालवले जात होते. म्हणूनच मुख्यमंत्री बदल करुन त्या ठिकाणी चन्नी यांना आणण्याचा निर्णय घेण्यात आला असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. (हेही वाचा, Shashi Tharoor and Ramdas Athawale: शशी थरुर आणि रामदास आठवले यांच्यात मजेदार ट्विट वॉर, आठवले यांनी घेतला शशी थरुर यांचा इंग्रजीचा क्लास)

ट्विट

पंजाबमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आहे. या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध आम आदमी पार्टी आणि भाजप असा सामना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत.