Vegitable Price Incresed: फळभाज्यांची आवक कमी, मागणी वाढल्याने टोमॅटो मटारच्या दरात वाढ
आता टोमॅटो बेंगळुरुहून आयात केली जात आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे घाऊक बाजारात (Pune Market) गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. कांदा, वांगी, गाजरच्या दरात घट झाली असून, टोमॅटो, काकडी, मटार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या आठवड्यात 125 ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून 4 ते 5 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि राजस्थानातून 11 ते 12 टेम्पो मटार, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून 30 ते 35 ट्रक बटाट्याची आवक झाली. (हेही वाचा - Maharashtra Farmers: राज्यात पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत भरपाई)
उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. आता टोमॅटो बेंगळुरुहून आयात केली जात आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं दरात वाढ झाल्याची माहिती दिल्लीच्या आझादपूर घाऊक बाजारातील टोमॅटो व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात घट होण्याची शक्यता जाणवत नाही.