Pulwama Terrorist Attack: दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद; पंतप्रधान म्हणाले 'जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही'
उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये सुरक्षादलावर हल्ला झाला होता. त्यानंतर असाच प्रकारचा मोठा हल्ला गुरुवारी झाला. हा हल्ला श्रीनगर-जम्मू हायवनजीक अवंतिपोरा परिरसारत झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या तळाला लक्ष्य बनवले.
जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. सुरुवातीला शहीद झालेल्या जवानांची संख्या आठ होती. आता ती वाढत जाऊन 40 वर पोहोचली आहे. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांच्या शौर्याचा आम्हाला अभीमान आहे. जवानांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. शहीद जवानांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये सुरक्षादलावर हल्ला झाला होता. त्यानंतर असाच प्रकारचा मोठा हल्ला गुरुवारी झाला. हा हल्ला श्रीनगर-जम्मू हायवेनजीक अवंतिपोरा परिरसारत झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या तळाला लक्ष्य बनवले.
या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगितले जात आहे की, आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने लष्करी तळावर हल्ला करण्याचा कट रचला होता. आदिल हा पुलवामाच्या काकापोरा परिसरातील राहणारा आहे. सीआरपीएफ च्या 54 व्या तुकडीचे जवान या दहशतवादी हल्याचे लक्ष्य ठरले. (हेही वाचा, जम्मू आणि काश्मीर: पुलवामा येथे दहशतवादी हल्ला; CRPF चे 8 जवान शहीद)
दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना लवकरात लवकर आराम मिळावा. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी सदिच्छा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या हल्ल्याला भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळावे अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनीही दहशतवाद्यांना धडा शिकवू असे म्हटले आहे.