उत्तर प्रदेश: रायबरेली येथे प्रचारादरम्यान प्रियंका गांधी सापाशी खेळताना दिसल्या; पहा Video

प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांचे वेगळे रुप पाहायला मिळाले.

Priyanka Gandhi (Photo Credits: ANI)

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेली (Raebareli) येथे प्रचार करत होत्या. प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांचे वेगळे रुप पाहायला मिळाले. प्रचार करताना गारुडीच्या (Snake Charmers) खेळात प्रियंका रमल्या आणि भररस्त्यात बसून सापांशी खेळू लागल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात भलताच व्हायरल होत आहे. (सर्वांना माहिती आहे राहुल गांधी हे भारतीय- प्रियांका गांधी)

तुम्ही व्हिडिओत पाहू शकता प्रियंका गांधी न घाबरता अगदी सहजतेने सापाला हाताळत आहेत. मागून कोणीतरी काळजी घेण्यासाठी बजावत असताना त्या म्हणाल्या की, "नाही नाही.. काही नाही करणार. बघा एक साप खाली गेला. उलट तोच घाबरत आहे बिचारा." त्यानंतर प्रियंका गांधींनी स्वतः त्या सापाला टोपलीत ठेवले. तेव्हा मागून कोणीतरी म्हणालं, टोपली लावून घ्या. त्यावर प्रियंका गांधी म्हणतात, का घाबरताय? त्यांच्या या प्रश्नावर उपस्थित हसू लागतात.

ANI ट्विट:

जानेवारी महिन्यात काँग्रेस पक्षात सरचिटणीस पद प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक प्रियंका गांधी लढवणार यावर चर्चा होऊ लागल्या. मात्र कालांतराने प्रियंका गांधी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif