Bibek Debroy Passes Away: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन; 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिल्ली एम्सने सांगितले की, बिबेक देबरॉय यांचा मृत्यू आतड्याच्या समस्येमुळे झाला. भारत सरकारने बिबेक देबरॉय यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
Bibek Debroy Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आर्थिक सल्लागार समिती (Prime Minister's Economic Advisory Committee) चे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय (Bibek Debroy) यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. बिबेक देबरॉय हे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरूही राहिले आहेत. दिल्ली एम्सने सांगितले की, बिबेक देबरॉय यांचा मृत्यू आतड्याच्या समस्येमुळे झाला. भारत सरकारने बिबेक देबरॉय यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
देबरॉय हे 5 जून 2019 पर्यंत NITI आयोगाचे सदस्य होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली तसेच लेखही लिहिले आणि संपादित केले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी यांनी म्हटलं आहे की, 'मी डॉ. देबरॉय यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मला त्यांचे अंतर्दृष्टी आणि शैक्षणिक चर्चेची आवड नेहमी लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.' (हेही वाचा - Nishad Yusuf Passes Away: बॉबी देओलच्या 'कंगुवा' चित्रपटाचे संपादक निशाद युसूफ यांचे 43 व्या वर्षी निधन; कोचीतील घरात आढळले मृतावस्थेत)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक -
पीएम मोदी यांनी पुढे लिहिलं आहे की, 'डॉ. बिबेक देबरॉय हे मोठे विद्वान होते. अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि इतर अनेक क्षेत्रात ते पारंगत होते. आपल्या कार्यातून त्यांनी भारताच्या बौद्धिक भूभागावर अमिट छाप सोडली आहे.'