COVID 19 In India: PM Narendra Modi यांची आज देशातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत Video Conferencing द्वारा बैठक

PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ओमिक्रॉनची (Omicron) वाढती दहशत पाहता प्रशासन देखील अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. दरम्यान देशातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. संध्याकाळी 4.30 च्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा ही मीटिंग होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. देशात आता किशोरवयीन मुलांना लसीकरण सुरू झाले आहे सोबतच 60 वर्ष आणि सहव्याधी असणारे नागरिक, फ्रंट लाईन वर्कर्स व आरोग्य कर्मचार्‍यांना बुस्टर डोस देखील देण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा आढावा या बैठकीत घेतला जाऊ शकतो. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबत, ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचं आवाहन केले जाऊ शकते. दिल्ली, मुंबई, कर्नाटक राज्यामध्ये सध्या कोविड नियमावली कडक करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्राकडून आता नवी नियमावली जारी होणार का? याकडे देखील लक्ष असणार आहे. हे देखील नक्की वाचा: सुरु झाली Covid-19 ची तिसरी लाट, जानेवारी-अखेरपर्यंत पोहोचेल पीकवर; मंत्री Rajesh Tope यांची माहिती .

ANI Tweet

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोवॅक्सिनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबतचे कॉल्स येत आहेत. आजच्या व्हिसी मध्ये केंद्राकडे 50 लाख कोविशिल्ड आणि 40 लाख कोवॅक्सिन लसींची मागणी केली जाणार आहे.

युरोपामध्ये ओमिक्रॉन वायरस थैमान घालत आहे. कोरोनाचा हा नवा वायरस झपाट्याने पसरत असल्याने त्याबददल अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच लस न घेतलेल्यांच्या तो जीववर बेतण्याची शक्यता अधिक असल्याने ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर घ्यावी असं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आले आहे.