दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामलीला मैदानावर आज भव्य रॅली; विधानसभा निवडणूकांच्या प्रचाराचा नारळ फूटणार?

बीजेपीने दिल्लीमध्ये 174 अवैध कॉलनी (Unauthorised Colonies)यांना नियामित केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी 11 च्या सुमारास एक रॅली आयोजित केली आहे.

PM Narendra Modi File Photo (Photo Credits: Getty Images)

दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज (22डिसेंबर) आज नरेंद्र मोदी यांची भव्य सभा होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून या रॅलीमध्ये सुमारे दीड लाखाची गर्दी असेल असा दावा करण्यात आला आहे तर बीजेपीने दिल्लीमध्ये 174 अवैध कॉलनी (Unauthorised Colonies)यांना नियामित केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी 11 च्या सुमारास एक रॅली आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून धोका; दिल्लीच्या रामलीला मैदानावरील रॅली दरम्यान सुरक्षा वाढवण्याचे गुप्तचर यंत्रणेचे आदेश.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून या सभेदरम्यान घातपात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर या सभेला कडेकोट सुरक्षा ठेवलीजाणार आहे. सध्या नागरिकत्व कायद्यावरून देशभरात आंदोलनं, निदर्शनं सुरू आहेत. त्यावर नरेंद्र मोदी आज काय बोलणार? याकडे अनेकांचे लागले आहे. तसेच नववर्षात फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणूका अपेक्षित आहेत. त्याचं बिगुल देखील आजच्या सभेत वाजणार का? अशी देखील चर्चा जोर धरत आहे. दिल्लीत CAA विरूद्ध दरियागंज येथे निदर्शनं सुरू आहेत. हे ठिकाण रामालीला मैदानापासून अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरावर आहे.

रामलीला मैदानावर आयोजित भाजपाच्या भव्य रॅलीमुळे आज मध्य दिल्लीमध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. कारसाठी या दरम्यान सिविक सेंटर परिसरामध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये माता सुंदरी रोड, पावर हाऊस रोड, राजघाट पार्किंग, शांतीवन पार्किंग, राजघाट आणि समता स्थळ याजवळ बस पर्किंग असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif