World Generally View Favourably To India: राहुल गांधी यांच्या पेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक लोकप्रिय नेते- Pew Survey
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सर्वात लोकप्रिय कोण या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक भारतीयांनी मोदींना अनुकुलता दर्शवली आहे. मोदींनी राहुल यांच्यावर 17 टक्क्यांची आघाडी घेतली आहे. ते राहुल गांधींपेक्षा 79 टक्के अधिक लोकप्रिय आहेत.
Pew Survey: जगभरातील 23 हून अधिक देशांतील लोकांमध्ये करण्यात आलेल्या एका नवीन सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, जग भारताकडे सामान्यतः अनुकूलतेने पाहत आहे. सर्वेक्षणात असेही आढळून आले की अलिकडच्या वर्षांत त्यांच्या देशाचा जागतिक प्रभाव वाढला आहे असे बहुतेक भारतीयांनी म्हटले आहे. असे असले तरी उर्वरीत जग मात्र या दाव्याशी असहमत आहे आणि एकतर भारताच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही किंवा तो कमकुवत होताना दिसत आहे, असे मत नोंदवताना दिसत आहे. या सर्वेक्षणासाठी 24 व्या देशात मतदान घेतलेल्या भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदासाठीचे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर दोन अंकी आघाडी घेतली. G-20 च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या वर्षात जगातील भारताच्या प्रतिमेचे मूल्यांकन करण्यासाठी Pew Research Center द्वारे बहु-राष्ट्रीय सर्वेक्षण आयोजित केले गेले होते. ज्यांचे नेते त्यांच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी काही दिवसात नवी दिल्ली येथे एकत्र येणार आहेत.
Pew ने मार्च ते मे दरम्यान 23 देशांमधील 28,250 आणि भारतात 2,611 लोकांना फोन आणि इंटरनेटवर आणि समोरासमोर मुलाखतीच्या माध्यमातून नागरिकांची मते जाणून घेतली. मंगळवारी जाहीर झालेल्या सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की 46 टक्के उत्तरदात्यांचे मत भारताबाबत अनुकूल आहे आणि 34 टक्के लोकांचे मत प्रतिकूल आहे.
भारताविषयीचे अनकुल मत नोंदवणाऱ्यांमध्ये इस्रायल (७१ टक्के), त्यानंतर युनायटेड किंगडम (६६ टक्के), केनिया (६ टक्के), नायजेरिया (६० टक्के), दक्षिण कोरिया (५८ टक्के), (जपान) यांचा क्रमांक लागतो. ५५ टक्के, ऑस्ट्रेलिया (५२ टक्के), युनायटेड स्टेट्स (५१ टक्के) आणि कॅनडा (४७ टक्के) या देशांचा समावेश आहे.
दुसऱ्या बाजूला अनेकांनी म्हटले आहे की, भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने भारताचा जागतिक प्रभाव वाढत आहे यावर त्यांना विश्वास नाही. इस्रायलमध्ये केवळ 29 टक्के , यूकेमध्ये 34 टक्के, जपानमधील 32 टक्के आणि अमेरिकेतील 23 टक्के लोकांनी भारताचा प्रभाव अलिकडच्या वर्षांत वाढल्याचे सांगितले. याउलट, सर्वेक्षणासाठी मतदान केलेल्या 68 टक्के भारतीयांनी सांगितले की, अलीकडच्या काळात त्यांच्या देशाचा जागतिक प्रभाव वाढला आहे.
ज्या देशांनी भारताकडे सकारात्मकतेने पाहिले नाही ते देश आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे- दक्षिण आफ्रिका (51 टक्के), नेदरलँड्स (48 टक्के), स्पेन (49 टक्के) आणि ऑस्ट्रिया (45 टक्के) यांनी केले. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सर्वात लोकप्रिय कोण या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक भारतीयांनी मोदींना अनुकुलता दर्शवली आहे. मोदींनी राहुल यांच्यावर 17 टक्क्यांची आघाडी घेतली आहे. ते राहुल गांधींपेक्षा 79 टक्के अधिक लोकप्रिय आहेत. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी यांसारख्या काँग्रेस नेत्यांच्याही ते खूप पुढे असल्याचे सर्व्हेमध्ये दिसते.
सर्वेक्षणाच्या इतर निष्कर्षांमध्ये, भारतीयांनी सांगितले की त्यांचा अमेरिका आणि रशिया या दोघांवर विश्वास आहे . त्यांचा देश आणि त्याचे नेते व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. अलीकडच्या वर्षांत भारताचा प्रभाव वाढला आहे. 10 पैकी चार भारतीयांनी सांगितले की त्यांना वाटते की चीनचा प्रभाव अधिक मजबूत झाला आहे याउलट 10 पैकी तिघांनी सांगितले की ते कमकुवत झाले आहेत. 10 पैकी सात भारतीयांचा पाकिस्तानबद्दल प्रतिकूल दृष्टिकोन आहे. त्यापैकी 57 टक्के लोक पाकिस्तानबद्दल अत्यंत प्रतिकूल आहेत. केवळ 19% भारतीयांचा त्यांच्या पाश्चात्य शेजाऱ्यांबद्दल अनुकूल दृष्टिकोन आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)