Press Freedom Predators: पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या 37 नेत्यांची यादी जाहीर; PM Narendra Modi सह, इम्रान खान, किम जोंग-उन यांचा समावेश
परंतु आता काही नवीन चेहरे या यादीमध्ये सामील झाले आहेत. भारताचे पंतप्रधान मोदी व्यतिरिक्त दोन महिला नेत्या आणि एक युरोपियन चेहरादेखील प्रथमच यात सामील झाले आहेत
रिपोर्टर विदाउट बॉर्डर्सने (Reporters Without Borders) पाच वर्षानंतर जाहीर केलेल्या 'गॅलरी ऑफ ग्रीम पोर्ट्रेट'मध्ये पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. जगभरातील पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था 'रिपोर्टर विदाउट बॉर्डर्स' या संस्थेने 37 राष्ट्राध्यक्ष आणि सरकार प्रमुखांची नावे प्रकाशित केली आहेत. हे असे नेते आहेत जे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर कठोरपणे हल्ला (Press Freedom Predators) करीत आहेत. यातील निराशाजनक बाब म्हणजे या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.
मात्र भारतातील सत्ताधारी भाजपचे नेते आणि मंत्री अशा प्रकारच्या अहवालांना 'पक्षपाती' म्हणत आहेत. ते असेही म्हणतात की, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे जिथे पत्रकारांना टीका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. दुसरीकडे, मोदी सरकार माध्यमांवर आपली पकड घट्ट करीत असल्याचा पत्रकार संघटना आणि विरोधकांकडून सतत आरोप होत आहे. या अहवालावर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आरएसएफच्या अहवालात म्हटले गेले आहे की, काही नेते तर गेले दोन दशके पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. परंतु आता काही नवीन चेहरे या यादीमध्ये सामील झाले आहेत. भारताचे पंतप्रधान मोदी व्यतिरिक्त दोन महिला नेत्या आणि एक युरोपियन चेहरादेखील प्रथमच यात सामील झाले आहेत. यातील जवळजवळ 50 टक्के म्हणजेच 17 नेते पहिल्यांदा सामील झाले आहेत.
या यादीतील नवीन नावांमध्ये सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे महत्वाचे नाव आहे, ज्यांच्याकडे देशाचे सर्व अधिकार एकवटले आहेत. हा नेता पत्रकारांचे स्वातंत्र्य अजिबात सहन करत नाही. (हेही वाचा: केंद्राच्या कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर Jyotiraditya Scindia, Narayan Rane सह भाजप नेते दिल्लीत दाखल; पहा काय आहेत शक्यता)
मोदींव्यतिरिक्त, यावर्षीच्या यादीमध्ये उत्तर कोरियाचे किम जोंग-उन, ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, मोहम्मद बिन सलमान, हंगेरियन पंतप्रधान विक्टर ऑरबॅन, Min Aung Hlaing, तुर्कीचे रेसेप तैयिप एर्दोगान, फिलिपिन्सचे रॉड्रिगो दुतेर्ते, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, हाँगकाँगच्या प्रशासकीय प्रमुख कॅरी लॅम यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारत गेल्या चार वर्षांपासून या निर्देशांकात सतत खाली घसरत आहे, तो 2017 मध्ये 136, 2018 मध्ये 138, 2019 मध्ये 140 आणि मागच्यावर्षी 142 व्या स्थानावर आहे.