President Ramnath Kovind यांच्याकडून Air India One- B777 विमानाचं उद्घाटन; पहिल्या उड्डाणातून चैन्नईकडे रवाना
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी आज Air India One- B777 चं उद्घाटन केले आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद (Savita Kovind) यांनी आज Air India One- B777 चं उद्घाटन केले आहे. या विमानाच्या पहिल्या उड्डाणातून दोघेही चैन्नईला रवाना झाले आहे. दरम्यान आज राष्ट्रपती श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर मध्ये पूजा करण्यासाठी आंध्रप्रदेशच्या तिरूपतीला जाणार आहेत.
आज कोविंद तिरूमाला येथील भगवान श्री वेंकटेश्वर स्वामी च्या प्राचीन टेकडी मंदिरात पूजा अर्चना करणार आहेत. अधिकारिक माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज 5 तास आध्यात्मिक यात्रेसाठी तिरूपतीला पोहचणार आहेत.
ANI TWEET
दरम्यान आजच्या रामनाथ कोविंद यांच्या दौर्यासाठी कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर काही सुरक्षा वाढवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक मार्गांमध्ये बदल करत कडक नियम जारी केले आहे.श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर मध्ये पूजा केल्यानंतर आज दुपारी रामनाथ कोविंद अहमदाबाद साठी रवाना होतील.