Prayagraj Mahakumbh Stampede: कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची Judicial Inquiry होणार; Chief Minister Yogi Adityanath यांची माहिती
मौनी अमावस्येच्या दिवशीचे अमृतस्नान हा महाकुंभातील सर्वात महत्वाचा विधी आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज मध्ये उपस्थित होते.
प्रयागराज (Prayagraj) मध्ये आज मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नान मध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी होऊन 30 जण मृत्यूमुखी पडली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी या दुर्देवी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत जाहीर केली आहे.
महाकुंभात पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक लोक जखमी झाले आणि नंतर 'अमृतस्नान' दरम्यान पोलिसांच्या गराड्यातून बाहेर पडलेल्या गर्दीने आणि उभे राहणाऱ्यांना पायदळी तुडवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आणि सुमारे 10 कोटी यात्रेकरू येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. जाणून घ्या कुंभमेळ्यातील यंदाच्या शाहीस्नानाच्या 6 तारखा.
कशी झाली कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी
यूपी पोलिसांच्या माहितीनुसार, मोठा समुह बॅरिकेट्स तोडून आला. यामुळे गर्दी वाढली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळामधूनच चेंगराचेंगरी झाली. "आम्ही राज्य सरकारच्या वतीने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. न्यायालयीन आयोग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. या संदर्भात, मुख्य सचिव आणि डीजीपी स्वतः एकदा प्रयागराजला भेट देतील आणि आवश्यक असल्यास त्या सर्व मुद्द्यांचा विचार करतील...” अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
30 मृतांपैकी अद्याप 5 जणांची ओळख पटलेली नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. प्रयागराजचा कुंभमेळा 26 फेब्रुवारी पर्यंत आहेत तर अजून 3 शाही स्नान या कुंंभमेळ्यामध्ये होणार आहेत.