Prashant Bhushan Contempt Of Court: ज्येष्ठ वकील प्रशांंत भूषण यांंना कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी 1 रुपयाचा दंंड- सर्वोच्च न्यायालय
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायलय अवमानना प्रकरणात (Contempt Of Court Case) दोषी ठरवले आहे.आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली ज्यात न्यायालयाने भूषण यांंना 1 रुपयाचा दंंड सुनावला आहे
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायलय अवमान प्रकरणात (Contempt Of Court Case) दोषी ठरवले आहे. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली ज्यात न्यायालयाने भूषण यांंना 1 रुपयाचा दंंड सुनावला आहे. हा दंंड 15 सप्टेंंबर पर्यंत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे न केल्यास भूषण यांंच्या प्रॅक्टिस वर 3 वर्ष बंंदी आणण्यात येईल , तसेच 3 महिन्यासाठी तुरुंंगवासाची शिक्षा देखील भूषण यांंना ठोठावण्यात येईल असे सांंगण्यात आले आहे. आज सुप्रीम कोर्टात न्यायामुर्ती अरुण मिश्रा यांंच्या अध्यक्षतेखालील खंंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. प्रशांत भूषण न्यायालय अवमान प्रकरणातील 5 ठळक मुद्दे
प्राप्त माहितीनुसार, प्रशांंत भूषण यांंनी कोर्टाचा अपमान केल्याचे प्रकरण हे 2009 मधील आहे, एका ट्विट मध्ये त्यांंनी सर्वोच्च न्यायालयाच्या 8 माजी न्यायाधीशांना भ्रष्ट म्हटले होते. त्यानंतर भूषण यांनी आपल्या विधानाबाबत दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र कोणत्याही स्थिती माफी मागण्यास नकार दिला होता. अलिकडे सुद्धा आपण माफी मागितली तर आपल्या मतावर ठाम नाही असे वाटेल म्हणुनच माफी मागणार नाही असा पवित्रा भूषण यांंनी घेतला होता.
ANI ट्विट
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी या प्रकरणात प्रशांत भूषण यांना कडक शब्दात समज देऊन माफ करण्यात यावे. त्यांना शिक्षा देण्यात येऊ नये असे म्हंंटले होते मात्र प्रशांंत भूषण यांंनी केवळ ट्विटच नव्हे तर त्यानंंतर माफी न मागतानाही कोर्टाचा अपमान केल्याचे न्यायालयाचे म्हणणे होते.यावरुन आज अखेरीस त्यांंना शिक्षा सुनावण्यात आली आहे.