Pranab Mukherjee Health Update: प्रणब मुखर्जी यांंची प्रकृती खालावली; फुफ्फुसांमध्ये संसर्गाचे संकेत

File Image Of Pranab Mukherjee | Photo Credits: Twitter/ ANI

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची प्रकृती पुन्हा खालावल्याची माहिती Army Research&Referral Hospital कडून देण्यात आली आहे. दरम्यान प्रणब मुखर्जींच्या फुफ्फुसांमध्ये इंफेक्शन (lung infection) झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून त्यांच्या तब्येतीवर स्पेशॅलिस्ट डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान आज सकाळी प्रणब मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीटरच्या माध्यामातून प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत त्यांच्या तब्येतील सुधार होत असल्याचे संकेत मिळत असल्याचं ट्वीटरच्या माधयामातून सांगण्यात आले होते मात्र थोड्याच वेळात आता पुन्हा तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर; तब्येतीत सुधार - अभिजीत मुखर्जी

ANI Tweet

10 ऑगस्ट दिवशी प्रणब मुखर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यासोबतच त्यांच्यावर मेंदूच्या गाठीचं ऑपरेशन झालं आहे. यानंतर ते व्हेंटिलेटर आहेत. त्यांचे पॅरामीटर्स स्थिर असल्याची माहिती मागील काही मेडिकल बुलेटिनमधून देण्यात आली आहे.