Pranab Mukherjee Health Update: प्रणब मुखर्जी यांचा शस्त्रक्रियेनंतर 96 तासांचा Observation Period संपला; External Stimuli, उपचारांना प्रतिसाद : अभिजीत मुखर्जी यांची माहिती

दरम्यान 96 तासांचा त्यांचा observation period आज संपला असून vital parameters स्थिर आहेत.

Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचा चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी आज माहिती दिली आहे. दरम्यान 96 तासांचा त्यांचा observation period आज संपला असून vital parameters स्थिर आहेत. प्रणब मुखर्जी हे External Stimuli आणि उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती दिली त्यांनी दिली आहे.

10 ऑगस्टला प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या आर्मी आर अ‍ॅन्ड आर हॉस्पिटलमध्ये मेंदूत झालेल्या गाठीचे ऑपरेशन झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान तेव्हापासूनच प्रणब मुखर्जी व्हेटिंलेटरवर आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ANI Tweet

प्रणब मुखर्जींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी देशाचे संरक्षणमंत्री 10ऑगस्ट दिवशी हॉस्पिटलमध्ये पोहचले होते. दरम्यान काल त्यांच्या निधनाच्या अफवा देखील सोशल मीडीयामध्ये पसरल्या होत्या. तेव्हा देखील निधनाच्या वृत्ताचं खंडन करत प्रणब मुखर्जी यांची चिंताजनक असली तरीही स्थिर असल्याचं अभिजीत मुखर्जी यांनी स्पष्ट केले होते.