Power Grid in the Ladakh: चीन पुरस्कृत हॅकर्सकडून लद्दाख परिसरातील वीज केंद्रे लक्ष्य- रिपोर्ट

लद्दाख प्रदेशातील भारतीय वीज निर्मीती केंद्रे (Power Grid in the Ladakh) चायना पुरस्कृत हॅकर्सकडून (China State Hackers) कधीतरित्या लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. खासगी गुप्तहेर फर्मने दिलेल्या माहितीनुसार याबाबत बुधवारी (6 एप्रिल) खुलासा करण्यात आला आहे

Power Grid | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

लद्दाख प्रदेशातील भारतीय वीज निर्मीती केंद्रे (Power Grid in the Ladakh) चायना पुरस्कृत हॅकर्सकडून (China State Hackers) कधीतरित्या लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. खासगी गुप्तहेर फर्मने दिलेल्या माहितीनुसार याबाबत बुधवारी (6 एप्रिल) खुलासा करण्यात आला आहे. या माहितीमध्ये आढळून आले आहे की, आम्हाला या आणि पाठिमागच्या महिन्यात आढलून आले की, कमीत कमी सात 'इंडीयन स्टेट लोड डिस्पॅच सेंटर (SLDCs) च्या संभाव्य नेटवर्क्सना हे हॅकर्स लक्ष्य करत होते'. हे ग्रीड नियंत्रण आणि वीज प्रवाहीत करण्यासाठी महत्त्वाचे मनले जाते.

पाठिमागील 18 महिन्यांमध्ये भारतात 'स्टेट अँड रिजनल लोड डिस्पॅच सेंटर्स'ना (State and Regional Load Dispatch Centers) पहिल्यांदा RedEcho ने लक्ष्य केले. आता नुकतेच TAG-38 मध्ये अशाच प्रकारची कृती आढळून आली. एका रिपोर्टनुसार, हे सर्व भारतातील काही निवडक चीन पुरस्कृत हॅकर्सकडून प्रदीर्घ काळापासून केले जात आहे. एकरा रणनितीचा भाग म्हणून हे उद्योग केले जात आहेत. चीनमधील हॅकर्सचे हे काही निवडक ग्रुप सातत्याने गुप्त माहिती गोळा करण्यासाठी संधीच शोधत असतात. (हेही वाचा, चिनी रॉकेट स्टेजने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा केला प्रवेश, त्यामुळे काहीशी घबराट निर्माण)

ट्विट

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि भारतात आलेल्या चीनच्या विदेश मंत्र्यांनी नुकताच लद्दाख तनाव (Ladakh standoff) आणि यूक्रेन (Ukraine) वादामुळे उद्भवणाऱ्या भूराजकीय परिणामांवर चर्चा केली. भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनीही आपले चीनी समकक्ष वांग यी (Wang Yi) यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही देशांनी एकमेकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याबाबत परस्परसंमती दर्शवली. यात लद्दाखमधील परिस्थीती नियंत्रणात ठेवण्याबात दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now