Coronavirus Update in India: भारतात 18,522 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5,66,840 वर

भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ नवी दिल्ली (Navi Delhi), तमिळनाडू (Tamil nadu), गुजरातमध्ये (Gujrat) सर्वाधिक रुग्ण आहेत

Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने प्रचंड धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. भारत सरकार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, भारतात (India) मागील 24 तासांत 18,522 नवे रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 66 हजार 840 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 418 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांचा एकूण आकडा 16,893 वर पोहोचला आहे. देशात काल (29 जून) दिवसभरात 13,099 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,34,822 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

सद्य घडीला भारतात एकूण 2,15,125 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ नवी दिल्ली (Navi Delhi), तमिळनाडू (Tamil nadu), गुजरातमध्ये (Gujrat) सर्वाधिक रुग्ण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला करणार संबोधित

सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अनेक देश यावरील औषध व लस निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात अमेरिकेची कंपनी, गिलीड सायन्सेस इंक (Gilead Sciences Inc) यांनी एक दिलासादायक बातमी देत, रेमडेसीवीर (Remdesivir) नावाचे औषध बाजारात आणले आहे. या औषधाचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. आता कंपनीने रेमडेसीवीरचे दर निश्चित केले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif