Coronavirus Update: भारतात COVID-19 रुग्णांच्या आतापर्यंतची सर्वाधिक वाढ; 19,906 नव्या रुग्णांसह देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 5,28,859 वर

तसेच 13,832 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून देशात आतापर्यंत 3,09,713 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारत आरोग्य मंत्रालयाने(Health Ministry of India) दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत भारतात 19,906 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 410 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या (Coronavirus Cases) 5 लाख 28 हजार 859 इतकी झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 16,095 वर पोहोचला आहे. देशात सद्य घडीला 2,03,051 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच 13,832 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून देशात आतापर्यंत 3,09,713 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. राज्यात काल (27 जून) दिवसभरात 5318 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 67 हजार 600 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. यानुसार सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 59 हजार 133 इतका आहे. कालच्या दिवसभरात 4430 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवरची एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 84 हजार 245 आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.94 टक्के एवढे आहे. Coronavirus Vaccine: 'कोरोनावरील लस मिळण्यास एक वर्ष लागणार', WHO प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेससचा दावा

दरम्यान देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यां नी लॉकाडऊन आणका वाढविला आहे. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की कोविड-19 (COVID-19) वरील लस येत्या वर्षभरात मिळू शकेल असा जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दावा केला आहे.