Yes Bank Case: मुंबई मध्ये PMLA कोर्टाकडून राणा कपूर यांचा जामीन नामंजूर
दरम्यान त्यांच्यावर मनी लॉड्रिंगच्या अंतर्गत कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
मुंबई मध्ये आज (21 जुलै) PMLA कोर्टाने Yes Bankचे संस्थापक राणा कपूर यांचा जामीन नाकरला आहे. दरम्यान त्यांच्यावर मनी लॉड्रिंगच्या अंतर्गत कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या बॅंक घोटाळ्यामध्येच ईडी कडून त्यांना अटक करण्यात आली आहे. राणा कपूर यांच्या वकिलाकडून संबंधित केस बाबत तपासणी पूर्ण झाली आहे त्यामुळे आता राणा कपूर यांना तुरूंगामध्ये ठेवण्याचं कारण नाही. त्यांना जामीन देण्यात यावा असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच पुरावे देखील डॉक्युमेंटरी मध्ये असल्याने त्याची छेडछड आरोपी कडून केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची मुक्तता करावी.
दरम्यान आज मुंबईत PMLA कोर्टात राणा कपूर यांच्या जामीनाची सुनावणी स्पेशल जज पी. पी. राजवैद्य(P P Rajvaidya)यांच्यासमोर झाली. दरम्यान Prevention of Money Laundering Act अंतर्गत राणा कपूर मार्च महिन्यापासून ज्युडिशिएल कस्टडीमध्ये आहेत. Yes Bank Crisis: राणा कपूर यांनी विकत घेतलेले राजीव गांधी यांचे पेटींग्स ED कडून जप्त.
PTI Tweet
DHFL या त्यांच्या कंपनीची ईडीकडून तपासणी सुरू आहे. सुरूवातीच्या तपासामध्ये राणा कपूर यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि तीन मुलींची देखील चौकशी झाली आहे. दरम्यान राणा कपूर हे मोठ्या कॉरपरेट्सना कर्ज देण्यासाठी लाच घेत होते. त्यानंतर त्यांना नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणून जाहीर करत असे असा त्यांच्यावर आरोप आहे.