पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपुरम च्या समुद्र किना-यावर अथांग सागराला उद्देशून लिहिली एक भावपूर्ण कविता

ही कविता त्यांनी ट्विटरवर शेअर केली. 'हे सागर, तुम्हें मेरा प्रणाम!' असे या कवितेच्या ओळी आहेत.

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे जगभरातील दौरे हे सुरुच आहेत. जगाच्या कानाकोप-यात सतत फिरणारे पीएम नरेंद्र मोदी यांचे अन्य देशातील अनुभवही तितकेच वेगळे असतील कदाचित. असाच एक दौरा नरेंद्र मोदी यांनी चीनच्या राष्ट्रपती जिनपिंग (President Xi Jinping) यांच्याशी तमिळनाडूतील महाबलीपुरम येथे दुसरी अनौपचारिक भेट झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील समुद्र किना-यावर बसून एक सुंदर कविता लिहिली. ही कविता त्यांनी ट्विटरवर शेअर केली. 'हे सागर, तुम्हें मेरा प्रणाम!' असे या कवितेच्या ओळी आहेत.

या कवितेला ट्विटरवर शेअर करत मोदींनी असे लिहिले आहेत की, 'काल मी महाबलीपुरमच्या समुद्र तटावर सकाळी फिरण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथील शांतता आणि आल्हाददायक वातावरणात मी कळत-नकळत समुद्राशी बोलायला लागलो. हा संवाद माझे भावविश्व आहे. म्हणून हा संवाद मी कवितेच्या रुपात मांडला तो तुमच्याशी शेअर करावा असे वाटले.'

नरेंद्र मोदी यांचे ट्विट:

नरेंद्र मोदी यांची जिनपिंग सोबतची बातचीत ही दोन दिवस चालली. या भेटीत दहशतवादासहित अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी दोन्ही देश आपापसांतील मतभेद सामंजस्याने मिटवतील यावर एकमत झाले.

हेदेखील वाचा- पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या 'त्या' कलाकारांवर FIR दाखल; अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 जणांचा समावेश

दोन दिवसांत जवळपास 7 तास ही चर्चा झाली. 24 तासांच्या भारत यात्रा नंतर जिनपिंग शनिवारी (12 ऑक्टोबर) ला नेपाळ साठी रवाना झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif