पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात बदल; आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार

जम्मू-कश्मीरच्या (Jammu and Kashmir) कलम 370 हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपले मौन सोडणार आहेत. आज रात्री 8 वाजता ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) वरुन ते देशाला संबोधित करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात बदल; आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार
Narendra Modi Announces Next Man Ki Baat On 30th June (Photo Credits: File Image)

जम्मू-कश्मीरच्या (Jammu and Kashmir) कलम 370 हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपले मौन सोडणार आहेत. आज रात्री 8 वाजता ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) वरुन किंवा टेलिव्हिजनवरुन ते देशाला संबोधित करणार आहे. 7 ऑगस्टला मोदी या मुद्यावर देशाला संबोधित करणार होते. मात्र भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या दु:खद निधनामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. आणि त्यापुढे त्यांना हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. याआधी 27 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते.

हा आठवड्यात भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला असा ऐतिहासिक निर्णय झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या जम्मू-कश्मीर मुद्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटवून एक नवा इतिहास घडवला. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोलतील किंवा काय बोलतील यावर सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची निधनाची बातमी ऐकताच हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

ANI चे ट्विट:

 

हेही वाचा- Jammu and Kashmir: जम्मू-कश्मीर मधील कलम 370 रद्द, विभाजन विधेयक 370 विरुद्ध 70 मतांनी लोकसभेत मंजूर

त्यावर आज अखेर जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

केंद्राने जम्मू-कश्मीरबाबत जे महत्वपुर्ण पाऊल उचलले आहे त्यामागे नेमकी काय रणनीती होती, त्याचा उद्देश काय, जनतेला त्याचा काय फायदा होईल, हे या भाषणात मोदी नमूद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2019 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).