PM Narendra Modi To Visit Ayodhya Today: पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत विमानतळ, नवीन रेल्वेगाड्यांचे आज उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण तपशील

पंतप्रधन नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अयोद्या विमानतळ, रेल्वेस्टेशन आणि त्यासोबतच इतर अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे आणि पंतप्रधानांचा दिवसभरातील कार्यक्रम आपण येथे जाणून घेऊ शकता.

PM Narendra Modi

उत्तर प्रदेश राज्यातील प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्या आले आहे. ज्यामध्ये तब्बल 15,000 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटनांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi To Visit Ayodhya Today) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा तपशील आपम येथे जाणून घेऊ शकता. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पुनर्विकास करुन उभारण्यात आलेल्या अयोध्या रेल्वे स्टेशनचे (Ayodhya Dham Junction Railway Station) पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11.15 वाजता उद्घाटन करतील. तसेच, अमृत भारत ट्रेन्स ( Amrit Bharat Trains) आणि वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Trains) हिरवा झेंडा दाखवतील. याच वेळी ते देशभरातील इतरही अनेक रेल्वे स्टेशन्स देशाला समर्पित करतील.

15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी

साधारण दुपारी 12.15 वाजता पंतप्रधान मध्यप्रदेशमध्ये नव्यानेच उभारण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील जेथे ते उद्घाटन करतील आणि राज्यातील 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. ज्यामध्ये अयोध्या आणि आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. (हेही वाचा, Ayodhya Ram Temple: राम मंदिर उद्घाटनानंतर महाराष्ट्रातून धावणार ‘अयोध्या स्पेशल’ ट्रेन; Shivsena UBT म्हणतात, 'देशातील लोकांचे वास्तविक समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा मार्ग')

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवसभरातील कार्यक्रम

  • अयोध्या विमानतळाचे उद्घाटन
  • अमृत भारत आणि वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ
  • अयोध्या धाम जंक्शन पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचे उद्घाटन
  • अयोध्येतील चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण आणि सुशोभित केलेल्या रस्त्यांचे उद्घाटन
  • अयोध्येत ग्रीनफिल्ड टाऊनशिपसाठी पायाभरणी
  • वरील कार्यक्रमांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण उत्तर प्रदेशातील इतर अनेक प्रकल्पांचेही
  • उद्घाटन करणार आहेत. ज्यामध्ये रस्ते रुंदीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, LPG प्लांटची क्षमता
  • वाढवणे अशा विविध प्रकल्पांचाही समावेश आहे.

पंतप्रधानांनी शनिवारी (29 डिसेंबर) आपल्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या सरकारने जागतिक दर्जाची विकासकामे आणि सेवासुविधा उभारण्याचा निर्धार केला आहे. त्यासोबतच वाहतूक दळणवळण आणि समृद्धतेचा वारसा जपत प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येचा कायपालट करण्याचेही ठरवले आहे. त्याच दिशेने एक पाल टाकत मी नव्यानेच उभारण्यात आलेल्या विमानतळ आणि रेल्वे पुनर्विकासाचा उद्या शुभारंभ करत आहे. मला आणखी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे अयोध्या आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक भागात माझ्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही पतप्रधांनी म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now