PM Narendra Modi Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लसीकरणाबद्दल मोठ्या घोषणेसह 'या' मुद्द्यांवर महत्वाचा निर्णय
या काळात बहुतांश जणांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावल्याने मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. अशा प्रकराचे महासंकट आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती.
PM Narendra Modi Live Update: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विरोधात अद्याप सुरु आहे. या काळात बहुतांश जणांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावल्याने मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. अशा प्रकराचे महासंकट आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती. या महासंकटाच्या विरोधात देश एकत्रितपणे लढला आहे. कोविडच्या विरोधात लढण्यासाठी गेल्या सव्वाशे वर्षापासून देशात नवा इन्फ्रास्टक्चर तयार करण्यात आले आहे. देशात खुप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज आतापर्यंत लागली नव्हती. परंतु त्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार ज्यांना लसीची गरज आहे त्यांना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर देशात लसीकरणाचा वेग तुफान वाढला असून मुलांची सुद्धा गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी काही लसी सुद्धा उपलब्ध करुन दिल्या. कोरोनाच्या लढाईत मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंग आणि निमयांचे पालन करणे महत्वाचे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. देशात 23 कोटी लसीचे डोस उपलब्ध करुन दिल्याचे ही मोदी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत वैज्ञानिकांनी तयार केलेल्या लसींबद्दत त्यांचे कौतुक केले आहे. येत्या काळात लसीचा वेग वाढणार असून 7 कंपन्या त्यांच्या लसी तयार करत आहेत. तर 3 लसींबद्दल ट्रायल घेतले जात आहे. देशात सध्या एका नेझल वॅक्सीन संदर्भात सुद्धा अभ्यास केला जात आहे. परदेशातून ही लस आणण्यावर भर दिला जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस दिली गेली नाही तर परिस्थिती काय असती? असा सवाल सुद्धा मोदी यांनी विचारला. देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर विविध प्रश्न उपस्थितीत केले गेले. तर राज्यांना कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या मागण्या केंद्राने मागण्या पूर्ण केल्या. भारतात लसीकरण हे मुख्यत: केंद्राच्या निगराणीखाली पार पडले.(PM Narendra Modi's Address to The Nation Live Streaming on DD News: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात 5 वाजता जनतेशी संवाद साधणार, येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग)
>>राज्यांकडे लसीकरणासंदर्भात जी 25 टक्के जबाबदारी होती ती सुद्धा भारत सरकार घेणार आहे. त्यासाठी नव्या गाईडलाइन्स सुद्धा तयार केल्या जाणार आहे. येत्या 21 जूनला असणाऱ्या जागतिक योगा दिनानिमित्त 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस राज्यांना उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारांना लसीकरणावर कोणताही खर्च करता येणार नाही आहे.
>>देशातील सर्व नागरिकांसाठी भारत सरकारकडून लस उपलब्ध केली जाणार आहे. भारत सरकारच्या अभियानात मोफतच लस दिली जाणार आहे. परंतु ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची असेल त्यांना देशात तयार होणाऱ्या लसींमधील 25 टक्के लस थेट कंपनीकडून घेता येणार आहे. तसेच एका डोसवरील 125 रुपये सर्विस चार्ज घेऊ शकतात.
>>भारतात लसीकरणाचा वेग हा जगातील अन्य देशांपेक्षा सर्वाधिक आहे. लसीकरणाचा एक एक डोस खुप महत्वपूर्ण असून एका डोस मुळे प्रत्येक आयुष्य जोडले गेले आहे. राज्यांना डोस संदर्भात त्यांना किती लसींचे डोस मिळणार हे सांगितले जाणार आहे.
>>गेल्या वर्षात जेव्हा कोरोनामुळे लॉकडाउन लागू करावा लागला त्यामुळे प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत मोफत राशन नागरिकांना दिले जात होते. दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा मे आणि जूनसह दिवाळी पर्यंत मोफत राशन मिळणार आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीला किंवा परिवाराला उपाशी झोपू देणार नाही असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
Tweet:
>>कोरोनाच्या काळात लसीसंदर्भात व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्या आणि माहितींमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या. तसेच प्रसार माध्यमांनी सुद्धा त्या बद्दल विविध तर्कवितर्क काढले. जे नागरिक लसीकरणांबद्दल अफवा पसरवत आहेत ते भोळ्याभाबड्या लोकांच्या आयुष्यासोबत खेळत आहेत. तर नागरिकांसह तरुणांनी सुद्धा देशात लसीकरणासंदर्भात जागृतकता वाढवावी. कोरोनाच्या काळात सूट दिली म्हणजे कोरोना संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह सावध राहिले पाहिजे. कोरोनच्या लढाईत आपण सर्वजण जिंकू असा ठाम विश्वास मोदी यांनी अखेरीस व्यक्त केला.
उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्रासह काही राज्यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले आहेत. युपीमध्ये फक्त 4 जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू आहेत. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार नागरिकांना दिलासा देत काही गोष्टी टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आल्या आहेत. अंशत: लॉकडाउन अद्याप कायम आहे. पण नियम थोडे शिथील केल्यानंतर नागरिकांची गर्दी मात्र रस्त्यांवर दिसून येत आहे. मुंबई किंवा दिल्लीकरांना थोडी जरी सूट दिली की ते मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. परिणामी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास मदत होते. हिच स्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतेत पडले असतील. त्यांनी वारंवार नागरिकांना सूट दिल्यानंतर ही बेजबाबदारपणे वागू नका असे सांगितले आहे.