World Health Day 2020 च्या निमित्ताने पीएम नरेंद्र मोदी यांचा Covid 19 शी लढणार्‍या डॉक्टरसह मेडिकल टीमला सलाम; भारतीयांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी सामना करणार्‍या डॉक्टर्स, नर्स सह सार्‍या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांना सलाम केला आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

आज (7 एप्रिल) हा दिवस जगभरात World Health Day म्हणून साजरा केला जातो. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असल्याने भीतीचं वातावरण आहे. अशामध्ये जीवघेण्या आणि झपाट्याने पसरणार्‍या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरातील तज्ञ मंडळी, संशोधक, आरोग्य क्षेत्र कामाला लागले आहे. आज या दिवसाचं औचित्य साधत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी सामना करणार्‍या डॉक्टर्स, नर्स सह सार्‍या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांना सलाम केला आहे. सध्या मानवाचं War Vs Virus सुरू आहे, या युद्धात आरोग्ययंत्रणा आघाडीवर राहून लढा देत आहे. असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत आपण एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करू असे देखील त्यांनी म्हटलं आहे. Happy World Health Day 2020: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देणारे Quotes, Wishes, Messages शेअर करून प्रार्थना करा प्रियजनांच्या दीर्घायुष्याची!

दरम्यान यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत कोरोनाशी सामना करण्यासाठी social distancing चा निश्चय अधिक दृढ करू यामुळे आपल्यासह आपल्या कुटुंबीयांचेही आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल. हा दिवस आपल्याला वैयक्तिक फीटनेस वाढवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरो त्यामुळे एकूणच आपलं आरोग्य सुरक्षित राहील असेही ते म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट

भारतामध्ये सध्या 4421 कोरोनाबाधित एकूण रूग्ण असून 3981 लोकांवर देशभरात उपचार सुरू आहेत. यापैकी 326 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत तर 114 लोकांचा बळी गेला आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.