PM Narendra Modi Birthday: पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त Ajmer Sharif Dargah तयार करणार 4,000 किलो शाकाहारी लंगर; रात्री 10:30 वाजता मोठी शाही कढई पेटवून सोहळ्याला सुरुवात

स्वयंसेवक संघटित पद्धतीने अन्न वाटप करण्यास मदत करतील.

PM Modi (Photo Credit - ANI)

PM Narendra Modi Birthday: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 17 सप्टेंबर रोजी त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या निमित्त अजमेर शरीफ दर्गाने (Ajmer Sharif Dargah) एक मोठी घोषणा केली आहे. 17 सप्टेंबर रोजी अजमेर शरीफ दर्गाह येथे 4000 किलो शाकाहारी भोजनाचा लंगर (Vegetarian Langar) तयार करून त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि सेवा पखवाडा यानिमित्ताने अजमेर दर्गा शरीफ येथे ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध बडी शाही देगचा (मोठी शाही कढई) प्रयोग करण्यात येणार असून, 4000 किलो शाकाहारी भोजनाचे वाटप केले जाणार आहे. दर्ग्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दर्ग्याची ही परंपरा 550 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे.

अजमेर शरीफ येथील सय्यद अफशान चिश्ती यांनी बुधवारी सांगितले की, या दिवशी लोकांना शाकाहारी जेवणाचे वाटप केले जाईल. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील धार्मिक स्थळांवर सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आम्ही 4,000 किलो शाकाहारी अन्न तयार करू, ज्यामध्ये शुद्ध तांदूळ सोबत तूप, सुका मेवा इत्यादींचा वापर केला जाईल. या भोजनाचे गरिबांमध्ये त्याचे वाटप केले जाईल. सय्यद अफशान चिश्ती म्हणाले की, आम्ही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू.

भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन आणि अजमेर शरीफच्या चिश्ती फाउंडेशनतर्फे संपूर्ण लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. कढई गरम करण्यापासून ते अन्न वाटण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत श्रद्धेने आणि काळजीने पूर्ण केली जाते, असे दर्गाह अधिकाऱ्यांनी सांगितले. याद्वारे हजारो भाविक आणि साधकांना सेवा दिली जाते. हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यामध्ये रात्री 10:30 वाजता मोठी शाही कढई पेटवण्यापासून हा सोहळा सुरू होईल. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांतता, एकता, समृद्धी आणि कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली जाईल. (हेही वाचा: Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त BJP येत्या 17 सप्टेंबरपासून राबवणार Sewa Pakhwada; विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन)

सकाळपर्यंत अन्न वाटप सुरू होणार असल्याची माहिती दर्गा अधिकाऱ्यांनी दिली आहे, जेणेकरुन सर्व उपस्थितांना व आसपासच्या मंडळींना भोजनात सहभागी होता येईल. स्वयंसेवक संघटित पद्धतीने अन्न वाटप करण्यास मदत करतील. राष्ट्र आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी कृतज्ञता आणि एकतेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची समाप्ती होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की हा कार्यक्रम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या उत्सवाचे प्रतीक नाही तर सेवा आणि समाज कल्याणाची भावना देखील प्रतिबिंबित करतो.