Hindi Diwas 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह अमित शाह, राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना दिल्या हिंदी दिवसाच्या शुभेच्छा
ट्विटच्या माध्यमातून यांनी देशवासियांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सोशल डिस्टंसिंगचे भान राखत आज संपूर्ण देशभरात हिंदी दिवस (Hindi Diwas 2020) साजरा केला जात आहे. यामुळे दरवर्षी प्रमाणे देशभरात आज मोठ्या स्तरावर या दिनानिमित्त ठेवण्यात येणारे कार्यक्रम यंदा होणार नसले तरीही लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ट्विटच्या माध्यमातून यांनी देशवासियांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला या दिवसाच्या शुभेच्छा देत हिंदीच्या विकासासाठी अमूल्य योगदान देणा-या भाषातज्ज्ञांचे देखील अभिनंदन केले आहे.
तर गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या महानुभवांना नमन करून लोकांना जास्तीत हिंदी भाषा आत्मसात करावी असे आवाहन केले आहे.
तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सर्व हिंदी प्रेमींना या दिनाच्या शुभेच्छा देत हिंदीसह अन्य भारतीय भाषा एक राष्ट्रीय संस्कृती आणि संस्कारांनी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हिंदीचा विकास संपूर्ण विश्वात व्हावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
विविध भाषांनी समृद्ध असलेल्या या देशातील राष्ट्रभाषेची महती सा-या जगभरात पोहोचण्यासाठी या भाषेचा मान राखणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येक देशवासियाने हिंदी भाषेचा मान राखलाच पाहिजे असेच या दिग्गजांचे म्हणणे आहे.