Makar Sankranti 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 'या' राजकीय नेत्यांनी दिल्या मकर संक्रांती च्या शुभेच्छा!
File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

आज 14 जानेवारी अर्थात मकर संक्रांत (Makar Sankranti). देशातील विविध ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांती निमित्त तिळगुळ देऊन नात्यात गोडवा निर्माण केला जातो. आपापसातील कलह, हेवेदावे विसरुन पुन्हा नव्याने एकत्र येण्याचा संदेश हा सण देतो. या सणानिमित्त पतंगबाजी, हळदी-कुंकू, सुगड पूजन याचा उत्साह असतो. या गोड सणाच्या नेतेमंडळींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), एनसीपी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Makar Sankranti 2021 Wishes in Marathi: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी SMS, Quotes, WhatsApp Stickers द्वारा शेअर करून द्विगुणित करा आनंद)

पंतप्रधान नरेंद्र मोदी:

गृहमंत्री अमित शाह:

उपमुख्यमंत्री अजित पवार:

अनिल देशमुख:

सुप्रिया सुळे:

आपले सण अत्यंत अर्थपूर्ण आहेत. प्रत्येक सणातून काहीतरी संदेश दिला जातो. मकर संक्रांत नात्यातील गोडवा वाढवून जगणं अधिक सुखद करण्याची एक संधी घेऊन येते. तर 'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत आपआपासातील भांडणं मिटवा आणि नात्याची नव्याने सुरुवात करा. मकर संक्रांती च्या तुम्हा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!