PM Modi Turns 74: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस; ओडिशा मध्ये महिलांना 'सुभद्रा योजना' चं गिफ्ट देत करणार सेलिब्रेशन
आज नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवशीच एनडीए सरकारचे 100 दिवसही पूर्ण होत आहेत.
PM Modi's Birthday Schedule: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींच्या शुभचिंतकांकडून आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'सेवा पखवाडा' (Seva Pakhwada) साजरा केला जात आहे. दरम्यान आज नरेंद्र मोदी ओडिशाच्या (Odisha) दौर्यावर आहेत. तेथे महिलांना आज 'सुभद्रा योजना' (Subhadra Yojana) अर्पण करणार आहेत.
74 व्या वाढदिवसा दिवशी मोदी ओडिशामध्ये 'सुभद्रा योजना' सह 26 लाख जणांना पीएम आवास योजना अंतर्गत घरं देणार आहेत. भुवनेश्वरच्या Gadakana मध्ये आज ते लोकांना घरं देणार आहेत. दरम्यान पोलिस कमिशनर संजीव पांडा यांच्या माहितीनुसार, पीएम मोदी भुवनेश्वर एअरपोर्ट वरून ते Gadakana च्या झोपडपट्टीला भेट देणार आहेत. PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74 वा वाढदिवस, देश आणि जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव .
नरेंद्र मोदी यावेळी लाभार्थ्यांशी भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते जनता मैदान मध्ये सुभद्रा योजना लॉन्च करणार आहेत. तसेच काही इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसची देखील सुरूवात होणार आहे.
सुभद्रा योजना
आज नरेंद्र मोदी ओडिशामध्ये महिलांना सुभद्रा योजनेचं गिफ्ट देणार आहेत. सुभद्रा ही हिंदू पुराणकथांनुसार, जगन्नाथ यांची बहीण होती. तिच्या नावे ही योजना सुरू होत आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत गरीब महिलांना दहा हजार रूपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. 1 कोटी महिला यामध्ये लाभार्थी आहेत. पाच वर्षांसाठी दोन टप्प्यांत ही रक्कम त्यांना मिळणार आहे.
नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील मेहसाणा शहरात अत्यंत साध्या घरात झाला. 2001 ते 2014 पर्यंत सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी गुजरातचा कायापालट केला. 2014 मध्ये जेव्हा ते भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वाचा मार्ग राष्ट्रीय स्तरावर चालू झाला आणि सध्या ते तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत. आज त्यांच्या जन्म दिवशीच एनडीए सरकारचे 100 दिवसही पूर्ण होत आहेत.