PM Modi: पंतप्रधान मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन
गुजरातमधील काही महत्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटानासाठी तसेच काही महत्वाच्या घोषणा करण्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहे.
पंतप्रधान मोदी (PM Modi) आजपासून दोन दिवसांच्या गुजरात (Gujrat) दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील काही महत्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटानासाठी (Inauguration) तसेच काही महत्वाच्या घोषणा करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा असल्याची चर्चा आहे. आज पंतप्रधान मोदी साबरमती नदीवरील (Sabarmati River) पादचाऱ्यांसाठी असलेल्या अटल पुलाचे (Atal Bridge) उद्घाटन करणार आहेत. तसेच साबरमती रिव्हरफ्रंटवर (Sabarmati River Front) आयोजित खादी महोत्सवाच्या (Khadi Festival) कार्यक्रमात सहभागी होतील जिथे ते जनतेला संबोधीत करतील. तरी या सभेतून पंतप्रधान मोदी काही मोठ्या घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी भुज (Bhuj) येथील स्मृती वनचे उद्घाटन करणार आहेत. 2001 मध्ये झालेल्या भुकंपानंतर (Earthquake) स्मृती वन हे गुजरातच्या जनतेसाठी अत्यंत महत्वाचं मानल्या जात आहे. तसेच साबरमती नदीवरील (Sabarmati River) पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या पुलाला विशेष म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihar Vajpayee) यांचे नाव देण्यात आले आहे. एलईडी लाइट्सने (LED Lights) सजवलेल्या या पुलाची रचना खूपच आकर्षक आहे. हा अटल पूल सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे. हा पूल साबरमती रिव्हरफ्रंटच्या (Sabarmati River Front) पश्चिमेकडील फ्लॉवर गार्डन (Flower Garden) आणि पूर्वेकडील कला आणि संस्कृती केंद्राला जोडतो. याचा उपयोग पादचाऱ्यांना तसेच सायकलस्वारांना नदी ओलांडण्यासाठी करता येईल.(हे ही वाचा:- Nitin Gadkari: अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणींच्या कामामूळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्ता आली : नितीन गडकरी)
आज साबरमती (Sabarmati River) नदीवरील अटल पुलाचे उद्घाटन (Atal Bridge Inauguration), उद्या सुझुकी (Suzuki) कंपनीच्या कार्यक्रमासह कच्छ (Kutch) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. गुजरातमध्ये (Gujrat) लवकरच पार पडणाऱ्या निवडणूकांच्या (Gujrat Elections) पार्श्वभुमिवर पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) या दौऱ्याला विशेष महत्व आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)