PM Modi Independence Day 2023 Speech: भारत देश 100व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यापर्यंत विकसित देश झालेला असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा सलग 10व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत जनतेला संबोधित करण्याचा विक्रम केला आहे.
भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहणानंतर देशवासियांना संबोधित केले आहे. यावेळी भाषणामध्ये मोदींनी देशाची भ्रष्ट्राचार, तुष्टीकरण आणि परिवार वाद यांच्यापासून सुटका करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारताला येत्या 5 वर्षामध्ये जगातील तिसर्या क्रमाकांची अर्थव्यवस्था करणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला आहे. तसेच भारत हा देश जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा तो निश्चितच विकसित देश असेल असं म्हटलं आहे. हा विश्वास आपल्याला देशातील तिशी पेक्षा कमी असलेले तरूण, महिला यांच्यामधूनच आल्याचं म्हटलं आहे.
मणिपूर मधील स्थितीबाबत बोलत असताना मागील काही दिवसांपासून मणिपूर मध्ये स्थिती सुधारत असल्याचं ते म्हणाले आहेत. हिंसाचारामध्ये अनेकांनी जीव गमावले आहेत. पण आता तिथे शांतता प्रस्थापित होत आहे. यावेळी मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असल्याचं म्हटलं आहे. Independence Day 2023: 77व्या भारतीय स्वतंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर PM Narendra Modi यांच्या हस्ते ध्वजारोहण; IAF Helicopter द्वारा पुष्पवृष्टी (Watch Videos) .
भारताचा विकासाचा आढावा घेताना त्यांनी मागील 9 वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. तसेच अनेकांना गरिबीमधून बाहेर काढलं आहे. आज घेतलेल्या निर्णयांचा परिणाम देशाच्या विकासामध्ये पुढे 1000 वर्ष होणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. यावेळी संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी जनतेला आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून संबोधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा सलग 10व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत जनतेला संबोधित करण्याचा विक्रम केला आहे.