Human Trafficking: मानवी तस्करीच्या संशयावरुन फ्रान्समध्ये थांबवलेले विमान मुंबईत दाखल (Watch Video)

या विमानात 276 प्रवासी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी पूर्ण झाल्यावर विमानाने आपला प्रवास पूर्ण केला.

Airline passengers Of CSMIA | (Photo Credits: ANI/X)

मानवी तस्करी (Human Trafficking) होत असल्याच्या संशयावरुन फ्रान्समध्ये थांबवलेले A-340 विमान मुंबईत मंगळवारी (27 डिसेंबर) पहाटे उतरले. या विमानात 276 प्रवासी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी पूर्ण झाल्यावर विमानाने आपला प्रवास पूर्ण केला. विमानाने पॅरिसजवळील व्हॅट्री विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता प्रस्थान केले आणि पहाटे 4 वाजता ते मुंबईत पोहोचले. फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, विमान मुंबईला निघाले तेव्हा 276 प्रवासी होते. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह पंचवीस व्यक्तींचा समावेश होता. जे फ्रान्समधील काही भागामध्ये राहीले होते आणि त्यांच्यावर मानवी तस्करीचा संशय होता.

मानवी तस्करीचा संशय

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, मानवी तस्करीच्या संशयामुळे हे विमान फ्रान्समध्ये थांबविण्यात आले होते. आवश्यक चौकशी झाल्यानंतर आणि फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी विमानाला फ्रान्स सोडण्याची परवानगी दिल्यानंतर सोमवारी विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले. प्रवाशांच्या यादीतील मूळ 303 लोकांपैकी 276 जण विमानात होते. रोमानियन चार्टर कंपनी लीजेंड एअरलाइन्सद्वारे संचालित एअरबस ए340 फ्लाइट, यूएई ते निकाराग्वा, मध्य अमेरिकेतील, गेल्या गुरुवारी व्हॅट्री विमानतळावर उतरवण्यात आले.

काही प्रवाशांवर तस्करीचा आरोप

दरम्यान, विमानातून मागे राहिलेल्या काही संशयीत प्रवाशांवर मानवी तस्करीचा आरोप होता. मात्र, यातील काहींनी स्थानिक कोर्टापुढे सांगितले की, हे सर्व प्रवासी त्यांच्या स्वत:च्या इच्छेने विमानत चढले होते. त्यानंतर या सर्व संशयीतांची सुटका झाली. या प्रकरणात तपास यंत्रणेवर प्रसारमाध्यमांचा दबाव होता. परंतू हा दबाव झुगारुन यंत्रणा तपास करण्यात यशस्वी झाली, असे वकील सोहोम कोहेन यांनी सांगितले. (हेही वाचा, Indian Aircraft Returned From France: फ्रान्समध्ये अडकलेल्या 276 भारतीयांची सुटका; 4 दिवसानंतर विमान मुंबईत परतले)

व्हिडिओ

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या प्रकरणात दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर हे दोन्ही प्रवासी ताब्यात घेतले होते. प्रीफेक्टच्या कार्यालयाने या प्रवाशांना मध्य अमेरिकन देशात कोणत्या उद्देशाने आणि अटींखाली आणले जात होते यावर लक्ष केंद्रित करून न्यायालयीन तपास सुरू केला. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, फ्रेंच अधिकारी इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रकरणाचा तपास सुरू ठेवत आहेत. या प्रकरणात सुमारे 25 जणांनी आश्रयासाठी अर्ज केला आहे आणि त्यांना पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल विमानतळावरील आश्रय आणि चौकशीसाठी एका विशेष झोनमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान, हे विमान भारतामध्ये दाखल झाले. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर हे विमान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल झाल्यावर विमानतळावरुन बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हे प्रवासी आपले प्रवासी सामान घेऊन विमानतळाहून बाहेर पडताना दिसत आहेत.