Varun Gandhi on BJP Government: वरुण गांधी यांचे भाजप सरकारच्या कृषी धोरणावर सवाल, धान्याला आग लावतानाचा शेतकऱ्यांचा व्हडिओही सोशल मीडियावर शेअर
त्यांनी आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन धान खरेदी प्रक्रियेवर टीक करत एक व्हिडिओही शेअर केला आहे
पीलीभीत (Pilibhit) येथील भाजप खासदार वरुन गांधी (Varun Gandhi) यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार आणि केंद्र सरकार (BJP Government) यांच्या कृषी धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन धान खरेदी प्रक्रियेवर टीक करत एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत काही शेतकरी हताशपणे आपल्या धान्याला आग लावताना दिसत आहेत. लेटेस्टली मराठी या व्हि़डिओची पुष्टी करत नाही. वरुन गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी समोध सिंह पाठिमागील 15 दिवसांपासून आपल्या धानाची विक्री करण्यासाठी बाजारपेठेत चकरा मारत होते. तरीही त्यांचे धान विकलेच गेले नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:हून आपल्या धानाला आग लावली. व्यवस्थेने या शेतकऱ्यांना कोणत्या टोकावर आणून उभे केले आहे. कृषी नितीवर पुनर्विचाराची आवश्यकता आहे.
कृषी, धान खरेदी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा यांसारख्या भाजपच्या अनेक दाव्यांवर वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटच्यामाध्यमातून घरचा आहेरच दिला आहे. या आधी वरुन गांधी यांनी 21 ऑक्टोबरया दिवशीही उत्तर प्रदेशातील तराई येथे आलेल्या पुरावरुन सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. वरुन गांधी यांनी तेव्हा म्हटले होते की, अशा संकटातही लोकांनी जर स्वत:च स्वत:ची मदत करायची असेल तर मग सरकारची आवश्यकताच काय? (हेही वाचा, Varun Gandhi attacks on BJP: 'शेतकऱ्याचा छळ बंद करा!' वरुण गांधी यांचा भाजपवर निशाणा; अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा व्हिडिओ केला ट्विट)
ट्विट
वरुन गांधी यांनी लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणावरुनही योगी सरकारवर यापूर्वी जोरदार निशाणा साधला आहे. वरुन गांधी यांनी सातत्याने आरोप केला आहे की, लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. हिंसेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही.