दिव्यांगाना भविष्य निर्वाह निधी मध्ये मिळणार सूट
पीएफ मधील कमी योगदानाचा सहा नियम सरसकट सर्वांना लागू होणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दिव्यांगासाठी खुशखबर असून त्यांना लवकरच भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये सूट सरकारकडून देण्यात येणार आहे. पीएफ मधील कमी योगदानाचा सहा नियम सरसकट सर्वांना लागू होणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तर पीएफ 12 टक्क्यांऐवजी 2 ते 3 टक्के कमी देण्याची अनुमती काही कामागारांनाच मिळणार आहे. याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाने विविध गोष्टींबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 12 टक्के पीएफ सरकारकडे जमा करावा लागतो. कर्मचाऱ्याऐवढाच पीएफचा भाग कंपनी किंवा मालक यांना द्यावा लागतो. ही रक्कम ईपीएफओ यांच्याकडे जमा केली जाते. या 12 टक्यांमधील 8 टक्के रक्कम ही पेन्शनसाठी आणि राहिलेली रक्कम ही पीएफ किंवा विम्यासाठी वापरली जाते. तर आता 24 त 35 वयातील कामगारांना पीएफमध्ये 12 टक्क्यांऐवजी आता 2-3 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.पीएफबाबत एक प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पीएफ योगदानाची टक्केवारी सरसकट कमी करता येणार नाही आहे. तसेच सामाजिक सुरक्षा कोड मंजूर झाल्यास कमी पीएफ योगदानाविषयी नियम होणार आणि काही गटातील कर्मचाऱ्यांना पीएफचे योगदान कमी देण्याची मुभा मिळणार आहे.(केंद्रीय अर्थसंकल्पामुळे पहिल्यांदाच 'या' दिवशीही सुरु राहणार शेअर बाजार)