भारतामधील फार्मा कंपनी Dr Reddy’s Laboratories ने लॉन्च केले कोरोना व्हायरसचे औषध Avigan; 42 शहरांमध्ये मोफत होम डिलिव्हरी सुरु, जाणून घ्या कुठे कराल ऑर्डर

रेड्डीज लॅबोरेटरीजने (Dr. Reddy's Laboratories) आज, कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या उपचारासाठी असलेले औषध बाजारात आणण्याची घोषणा केली. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने फेवीपिराविर (Favipiravir) या औषधाची जेनेरिक आवृत्ती अविगन (Avigan) 200 mg टॅबलेट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

भारतातील प्रमुख फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने (Dr. Reddy's Laboratories) आज, कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या उपचारासाठी असलेले औषध बाजारात आणण्याची घोषणा केली. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने फेवीपिराविर (Favipiravir) या औषधाची जेनेरिक आवृत्ती अविगन (Avigan) 200 mg टॅबलेट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. डॉ. रेड्डीजच्या औषध अवीगनला कोविड-19 च्या मध्यम प्रमाणात संसर्ग असलेल्या संक्रमित रूग्णांवर औषधोपचार करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून मान्यता मिळाली आहे. कोरोना व्हायरसच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील संक्रमनासाठी या औषधाचा वापर होऊ शकतो.

फुजीफिल्म टोयामा केमिकल कंपनी लिमिटेडबरोबर जागतिक परवाना करारानुसार डॉ. रेड्डी यांना भारतात अविगन 200 मिलीग्राम टॅबलेटचे उत्पादन, विक्री व वितरण करण्याचा विशेष अधिकार मिळाला आहे. रुग्णांना त्वरित हे औषध मिळावे यासाठी, डॉ. रेड्डी म्हणाले की त्यांनी देशातील 42 शहरांमध्ये मोफत होम डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. या साठी हेल्पलाईन क्रमांक - 1800-267-0810 व मेल आईडी - www.readytofightcovid.in जारी केला आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या दरम्यान यावर संपर्क साधून ऑर्डर प्लेस केली जाऊ शकते.

ही सेवा सोमवार ते शनिवार चालू राहील. डॉ. रेड्डीज अवीगन हे दोन वर्षांच्या शेल्फ लाइफसह 122 गोळ्याच्या पूर्ण वैद्यकीय पॅकमध्ये उपलब्ध आहे. ल्युपिन, ग्लेनमार्क आणि सन फार्मा यांच्यासह टॉप औषध उत्पादकांनी भारतात कोविड-19 च्या उपचारासाठी, अँटीव्हायरल औषध फेवीपिराविरची जेनेरिक आवृत्ती यापूर्वीच बाजारात आणली आहे. (हेही वाचा: देशातील प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीमध्ये निर्माण झाल्या कोरोना विषाणूशी लढणाऱ्या Antibodies; पुण्यात 51 टक्के लोकांनी विकसित केल्या अँटीबॉडीज)

दरम्यान, फेविपिरवीर आणि रेमेडिसविर (Remdesivir) नावाचे आणखी एक अँटी-व्हायरल औषध भारतात कोविड-19 च्या उपचारांसाठी सर्वात जास्त वापरले जात आहे. कोरोना व्हायरस उद्रेक विरूद्ध लढा देण्यासाठी आपत्कालीन उपचार म्हणून यास आधीपासून मान्यता देण्यात आली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif