PFI Threat Letter: पीएफआयच्या ब्लॅकलिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहसह राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा समावेश; PFI च्या कार्यकर्त्याकडून धक्कादायक पत्र
सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शफी बिराजदार नामक सोलापुरातील एका व्यक्तीने हस्तलिखित पत्र पाठवत धमकी दिली आहे.
राज्यात गेले काही आठवड्यापासून राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने PFI शी जोडलेल्या परिसरात देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रात विविध ठिकाणी धडक कारवाई केली असुन यांत अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बीड (Beed), मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूरसह (Kolhapur) अशा विविध ठिकाणी कारवाई करत अनेकांना कडक कारवाई करण्यात आली असुन या तपासातून काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सोलापूरमध्ये PFI च्या कार्यकर्त्याने भाजप आमदार विजयकुमार देशमुख (BJP MLA Vijaykumar Deshmukh) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शफी बिराजदार (Mohhamad Sharif Birajdar) नामक सोलापुरातील (Solapur) एका व्यक्तीने हस्तलिखित पत्र पाठवत धमकी दिली आहे. या पत्रात अयोध्या (Ayodhya), मथुरेमध्ये (Mathura) आमचे सुसाईड बॉम्बर (Suicide Bomber) असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाहीतर राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) सुद्धा टार्गेटवर असल्याची खळबळजनक माहिती या पत्रातून देण्यात आली आहे. याशिवाय आता आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये (Black List) नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah), सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde), योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), राज ठाकरे (Raj Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे, असा इशाराही या पत्रात दिला आहे. (हे ही वाचा:- Nashik Bus Accident: नाशिक बस दुर्घटनेत केंद्र सरकारकडून 2 लाखांच्या मदतीची घोषणा तर राज्य सरकारकडून मोफत इलाजासह 5 लाखांच्या मदत जाहीर)
तसेच भाजप आमदार विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh) यांना तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे, ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन (Action Plan) आहे अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. तरी सोलापूर पोलिस (Solapur Police) या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. तसेच तुम्ही लोकांनी आमच्यासारख्या विषारी सापाच्या शेपटीवर पाय टाकलाय. आता आमचे मुले गप्प बसणार नाही. घराघरात कसाब (Kasab), अफजल गुरु, युसूफ, याकूब जन्माला येतील हे गोष्ट लक्षात घ्या, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.