Petrol Diesel Rate in India: भारतात सलग 21 व्या दिवशी पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत वाढ कायम; पाहूयात मुंबई, पुणे, नवी दिल्लीसह आजचे दर

मुंबईतही पेट्रोल-डिझलेच्या किंमतीत वाढ झाली असून आजचे पेट्रोलचे दर 87.14 रुपये तर डिझेलचे दर 78.71 रुपये इतके आहे.

पेट्रोल-डीजल (Photo Credits: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशात गेल्या 3 महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला आहे. यातच सलग 21 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत सुरु झालेली वाढ ही गोष्ट देखील दुष्काळात तेरावा अशी म्हणावी लागेल. आजच्या (27 जून) च्या नवीन दरानुसार नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोलच्या किंमतीत 0.25 पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या किंमतीत 0.21 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर 80.38 रुपये प्रति लीटर असून डिझेलचे दर 80.40 रुपये इतके आहेत. ही इंधन दरवाढ नागरिकांसाठी त्रासदायक ठरणारी आहे.

मुंबईतही (Mumbai) पेट्रोल-डिझलेच्या किंमतीत वाढ झाली असून आजचे पेट्रोलचे दर 87.14 रुपये तर डिझेलचे दर 78.71 रुपये इतके आहे. Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ कायम; मुंबई, दिल्ली यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहेत आज इंधनाचे दर?

पाहूयात भारतातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई रु.  87.14 रु. 78.71
दिल्ली रु. 80.38  रु. 80.40
चेन्नई रु. 83.59 रु. 77.61
कोलकाता रु.  82.05 रु. 75.52
बंगळुरु रु.  82.99 रु. 76.45
हैद्राबाद रु.  83.44 रु. 78.57
पुणे रु.  86.57 रु. 77.00
जयपूर रु.  87.96 रु. 81.60
लखनौ रु. 81.00 रु. 72.45

ऑईल कंपन्या 7 जून पासून इंधनाच्या दरात वाढ करत आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते.