Petrol-Diesel Price: अक्षय्यतृतीया दिवशी तुमच्या शहरात इंधनाचे दर काय? घ्या जाणून

या तेल दरांनुसार (Petrol-Diesel Price) सध्याततरी कोणते बदल पाहायला मिळत नाही. सकाळी सहा वाजता जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लीटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा दशभरातील पेट्रोल (Petrol ), डिझेलचे (Diesel ) ताजे दर जाहीर केले आहेत. या तेल दरांनुसार (Petrol-Diesel Price) सध्याततरी कोणते बदल पाहायला मिळत नाही. सकाळी सहा वाजता जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लीटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. इकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर दराने विकले जाते आहे. आज आक्षय्यतृतीया (Akshaya Tritiya) दिवशी आपल्या शहरातील इंधन दर घ्या जाणून.

IOCL देशभरातील इंधनाचे दर जाहीर करते. त्यानुसार देशभरातील दरांच्या आकडेवारीवर नजर टाकता आज त्यात कोणत्याही प्रकारचे बदल पाहायला मिळत नाहीत. देशभरातील सर्व शहरातील इंधन दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल आज 120.51 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर दराने विकले जाते आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये, तर डिझेल 99.33 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. चेन्नईत ही इंधन दर स्थिर आहेत. (हेही वाचा, Kerala Man Makes Electric Car: केरळमधील 67 वर्षीय Anthony Joh यांनी घरी बनवली इलेक्ट्रिक कार; फक्त 5 रुपयात धावते 60 किलोमीटर)

देशभरातील प्रमुख शहरांतील इंधन दर

दिल्ली

पेट्रोल-105.41

डिझेल- 96.67

मुंबई

पेट्रोल- 120.51

डिझेल-104.77

कोलकाता

पेट्रोल- 115.12

डिझेल- 99.83

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल (Crude Oil) च्या किमतीच्या आधारावीर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिदिन अपडेट केल्या जातात. ऑइल मार्केटींग क्पन्यांच्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेल दर निश्चित केले जातात. इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या प्रत्येक दिवशी सकाळी विविध शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीं अपडेट केल्या जातात.

आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर आपण SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. त्यासाठी इंडियन ऑयल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून तो 9224992249 क्रमांकावर पाठवायचा आहे.त्यानंतर आपल्याला काहीच वेळात शहरांतील दर पाहायला मिळू शकतात.