Petrol-Diesel Price Today: तीन महिन्यानंतर डिझेलच्या किंमतीत घट पण पेट्रोलचा भडका कायम, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर
आज पेट्रोल 28 पैशांनी महागले आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत आज एक लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना 101 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त झाले आहे.
Petrol-Diesel Price Today: देशात पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज पेट्रोल 28 पैशांनी महागले आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत आज एक लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना 101 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीकरांना एक लीटर पेट्रोलसाठी 101 रुपये 23 पैसे आणि डिझेलसाठी 89 रुपये 76 पैसे द्यावे लागणार आहेत. शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
देशातील सर्व महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. ज्या 15 राज्यात पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे ज्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख, सिक्किम आणि दिल्लीचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, जर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत वाढ होत असेल तर इंधनाच्या किंमती सुद्धा अधिक वाढल्या जातील. इंधनाच्या किंमतीत आतापर्यंत 40 दिवस वाढ झाली आहे. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर प्रती लिटरप्रमाणे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर! लवकरच मिळणार 'हा' लाभ)
दिल्ली-
>> पेट्रोल- 101.19 रुपये, डिझेल- 89.72 रुपये
मुंबई-
>> पेट्रोल- 107.20 रुपये, डिझेल- 97.29 रुपये
चेन्नई-
>> पेट्रोल-101.92 रुपये, डिझेल- 94.24 रुपये
कोलकाता-
>>पेट्रोल-101.35 रुपये, डिझेल-92.24 रुपये
आजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.