Petrol-Diesel Price Today: आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, दिल्ली, कोलकातासह तुमच्या शहराचे इंधनाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती 83 डॉलर प्रति बॅरल झाल्याने भारतीय बाजारात इंधनाच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Petrol-Diesel Price Today:  आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती 83 डॉलर प्रति बॅरल झाल्याने भारतीय बाजारात इंधनाच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवाळीपासून स्थिर आहेत. दरम्यान, राजस्थान मधील श्रीगंगानगर मध्ये पेट्रोल-डिझेलचे देशात सर्वाधिक दर आहेत. तर पोर्ट ब्लेयरमध्ये सर्वाधिक स्वत किंमतीने इंधनाची विक्री केली जात आहे.(Gold-Silver Price: मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई शहरांतील सोने चांदी दर, घ्या जाणून)

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या लेटेस्ट अपडेटनुसार, 13 नोव्हेंबरला राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 103.97 रुपये आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर.

>>मुंबई

पेट्रोल-109.98 रुपये, डिझेल- 94.14 रुपये प्रति लीटर

>>दिल्ली

-पेट्रोल-103.98 रुपये, डिझेल-86.67 रुपये प्रति लीटर

>>कोलकाता

-पेट्रोल- 104.67 रुपये, डिझेल-89.79 रुपये प्रति लीटर

>>चेन्नई

-पेट्रोल- 101.40 रुपये, डिझेल- 91.43 रुपये प्रति लीटर

दरम्यान, विदेशी चलानाच्या दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति दिनी अपडेट केल्या जातात. तेल मार्केटिंग कंपन्या किंमतीच्या समीक्षेनंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या प्रति दिन विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करतात.