Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर
तर डिझेल सुद्धा 100 रुपयांच्या पार काही ठिकाणी गेले आहेत.
Petrol-Diesel Price Today: सातत्याने वाढत्या किंमतीमुळे बहुतांश राज्यात पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटर पेक्षा अधिक किंमतीने विक्री केले जात आहे. तर डिझेल सुद्धा 100 रुपयांच्या पार काही ठिकाणी गेले आहेत. याच दरम्यान दिलासादायक बाब अशी की, गेल्या 5 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. गुरुवारी सलग 5 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.(Farmer Protest: आजापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन, सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त)
तर आज गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही वाढ किंवा घट झालेली दिसून आलेली नाही. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर झाले आहे. इंधनाच्या किंमती सातत्याने स्थिर राहत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
आजचे इंधन दर पुढीलप्रमाणे-
-मुंबई
पेट्रोल- 107.83 रुपये प्रति लीटर, डिझेल 97.45 रुपये प्रति लीटर
-चेन्नई
पेट्रोल- 101.49 रुपये प्रति लीटर, डिझेल-94.39 रुपये प्रति लीटर
-कोलकाता
पेट्रोल-102.08 रुपये प्रति लीटर, डिझेल-93.02 रुपये प्रति लीटर
-लखनौ
पेट्रोल-98.92 रुपये प्रति लीटर, डिझेल-90.26 रुपये प्रति लीटर
तर इंधन दरवाढीमुळे सामन्य नागरिक त्रस्त झाली आहे. केंद्र सरकार जर एक्साइज ड्युटी मध्ये काही कपात करत असेल तर सामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र सध्या असे काही होताना दिसून येत नाही आहे. CNBC-TV18 च्या रिपोर्ट्सनुसार. केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटी मध्ये जर 10 रुपये प्रति लीटर कपात केली तर यामध्ये फक्त 0.2 टक्केच महागाई कमी होईल.
दरम्यान, विदेशी चलानाच्या दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति दिनी अपडेट केल्या जातात. तेल मार्केटिंग कंपन्या किंमतीच्या समीक्षेनंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या प्रति दिन विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करतात.