Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; मुंबई, दिल्ली, कोलकातासह जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनाचे दर
त्यामुळे आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा भडकल्या आहेत
Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवस इंधन दराबद्दल थोडासा दिलासा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा भडकल्या आहेत. डिझेलचे दर 26 ते 28 पैसे तर पेट्रोलच्या किंमतीत 27-28 पैशांनी वाढ झाली आहे. आज दिल्लीत पेट्रोलचे दर 97.50 रुपये तर डिझेलचे दर 88.23 रुपये प्रति लीटर आहे. तसेच मुंबईत पेट्रोलची किंमत 103.63 रुपये आणि डिझेलची किंमत 95.72 रुपये प्रति लीटर आहे. वाहनांच्या इंधन दरात एकाच महिन्यात 29 वेळा वाढ झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी बुधवारी उच्चस्तर गाठला आहे.
प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या मध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टींचा समावेश करुन पेट्रोल-डिझेलचे दर जवळजवळ दुप्पट होतात. याच सोबत आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत त्याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो.(Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; पहा आजचा सोन्या-चांदीचा दर काय?)
जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
>>दिल्ली
डिझेल- 88.23, पेट्रोल 97.50
>>मुंबई
डिझेल-95.72, पेट्रोल-103.63
>>कोलकाता
डिझेल-91.08, पेट्रोल- 97.38
>>चेन्नई
डिझेल-92.83, पेट्रोल- 98.65
Tweet:
आजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.