Petrol Diesel Price Today: सलग तिसर्‍या दिवशी इंधनदरात वाढ; पहा तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेलचा दर

डिझेलचा दर 98.16 रूपये आहे.

Fuel Price Hike India | (File Image)

भारतामध्ये पुन्हा इंधनदरवाढीचा भडका सुरूच आहे. आज सलग तिसर्‍या दिवशी देशात पेट्रोल (Petrol Price)आणि डिझेलच्या दरात (Diesel Price) वाढ झाली आहे. सध्या देशात उच्चांकी इंधन दर नोंदवण्यात आले आहे. आज पेट्रोलच्या किंमतीमध्ये मागील काही महिने स्थिर असलेल्या दरांनंतर चौथ्यांदा दर वाढले आहेत तर 24 सप्टेंबरनंतर आता सहाव्यांदा डिझेलचे दर वाढले आहे. पेट्रोल आज 25 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी वधारले आहे.

इंधनदराच्या नव्या किंमतींनुसार, मुंबईमध्ये आता पेट्रोलचा दर Rs108.19 आहे. डिझेलचा दर 98.16 रूपये आहे. दिल्ली मध्ये पेट्रोल Rs 101.14 प्रतिलीटर आहे तर डिझेल Rs 90.47 आहे.

चैन्नई मध्ये पेट्रोल Rs 99.76 आहे तर डिझेल 94.99 रूपये प्रतिलीटर आहे. कोलकाता मध्ये पेट्रोल Rs 102.74 आहे तर डिझेल Rs 93.54 आहे. जागतिक बाजारामध्ये क्रुड ऑईलची किंमत वाढती असल्याने भारतामध्येही इंधनदरामध्ये वाढ नोंदवली जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

देशात प्रत्येक राज्यामध्ये करप्रणाली वेगवेगळी असल्याने कमिशन, टॅक्स यांचं गणित करून किंमती वेगवेगळ्या आहेत. रिपोर्ट्स नुसार देशात सर्वाधिक वॅट राजस्थान मध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून).

भारतामध्ये 3 ऑईल मार्केटिंग कंपन्या आहेत. यामध्ये HPCL, BPCL आणि IOC यांचा समावेश आहे. नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल, डिझेलचे दर त्यांच्याकडून जाहीर केले जातात. त्यांच्या दरांची यादी नियमित वेबसाईट वर देखील प्रसिद्ध केली जाते. सोबत्च मोबाईल वर देखील एसएमएस अलर्ट्स द्वारा देखील ती सांगितली जाते. पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असतात. अनेकदा हे दर दुप्पट होतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif