Petrol-Diesel Price Today: आज डिझेलचे दर स्थिर, पेट्रोलच्या दरांत वाढ कायम; जाणून घ्या मुंबई सह प्रमुख शहरांतील इंधनदर
यामध्ये HPCL, BPCL आणि IOC यांचा समावेश आहे. नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल, डिझेलचे दर त्यांच्याकडून जाहीर केले जातात.
भारताच्या मुख्य शहरांमध्ये आज (5जुलै) पुन्हा इंधन दर वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली सह देशातील प्रमुख शहरात आतापर्यंतचे सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेलचे दर नोंदवण्यात आले आहेत. सध्या डिझेलचे दर स्थिर असले तरीही पेट्रोलच्या दरांमध्ये 35 पैशांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै महिन्यातील ही तिसरी इंधन दरवाढ आहे. दरम्यान मागील दोन महिन्यात पेट्रोलचे दर 34 तर डिझेलचे दर 33 वेळेस वाढल्याने आता सर्वसामान्यांसमोर बजेट सांभाळण्याचं मोठं आव्हान आहे.
भारतामध्ये 730 पैकी 332 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल शंभरी पार गेले आहे. दिल्लीमध्ये देखील पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. इंटरनॅशनल मार्केट मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 76 डॉलर प्रति बॅरल आहे. या वाढत्या दरामुळे आता घरगुती इंधन दरांमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे आणि भविष्यातही ही वाढ अजून कायम राहण्याचा अंदाज आहे. 2021 मध्ये केवळ 4 वेळेस इंधन दरात कपात झाली आहे.
पहा मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरातील इंधन दर काय आहेत?
दिल्ली - पेट्रोल 99.86 रुपये आणि डीजल 89.36 रुपये प्रति लीटर
मुंबई - पेट्रोल 105.92 रुपये आणि डीजल 96.91 रुपये प्रति लीटर
चेन्नई - पेट्रोल 100.75 रुपये आणि डीजल 93.91 रुपये प्रति लीटर
कोलकाता - पेट्रोल 99.84 रुपये आणि डीजल 92.27 रुपये प्रति लीटर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
भारतामध्ये 3 ऑईल मार्केटिंग कंपन्या आहेत. यामध्ये HPCL, BPCL आणि IOC यांचा समावेश आहे. नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल, डिझेलचे दर त्यांच्याकडून जाहीर केले जातात. त्यांच्या दरांची यादी नियमित वेबसाईट वर देखील प्रसिद्ध केली जाते. सोबत्च मोबाईल वर देखील एसएमएस अलर्ट्स द्वारा देखील ती सांगितली जाते. पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असतात. अनेकदा हे दर दुप्पट होतात.