Petrol, Diesel Price In India Today: महिन्याभरात आज 10व्यांदा इंधनदरवाढ; मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 103 रूपयांच्या पार!
आजच्या नव्या दरानुसार, मुंबई मध्ये पेट्रोल 103.08 रूपये तर दिल्लीत 96.93 पैशांनी विकलं जात आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर आज (18 जून) महिन्याभरात पुन्हा दहाव्यांदा वाढले आहेत. दरम्यान सध्या देशभरात पेट्रोल, डिझेलचे उच्चांकी दर आहेत. ऑईल रिटेलर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजच्या नव्या दरानुसार, मुंबई मध्ये पेट्रोल 103.08 रूपये तर दिल्लीत 96.93 पैशांनी विकलं जात आहे. तर डिझेल अनुक्रमे 95.14, 87.69 रूपये प्रतिलीटर आहे. सध्या देशातील 9 राज्यांमध्ये पेट्रोलचा प्रति लीटर दर हा शंभरीपार गेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटचं गणित कोलमडणार असल्याचं चित्र आहे.
मागील मार्च महिन्यात 5 राज्यातील विधानसभा निवडणूकींच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या पण पेट्रोल-डिझेलचे भाक स्थिर होते पण निवडणूक निकालानंतर आता पुन्हा इंधन दरवाढ सुरू झाली आहे.
मुंबई, दिल्ली, बेंगलोर, कोलकाता मधील इंधनदर
मुंबई - पेट्रोल (103.08 रूपये प्रतिलीटर) , डीझेल (95.14 रूपये प्रतिलीटर)
दिल्ली - पेट्रोल (96.93 रूपये प्रतिलीटर) , डीझेल ( 87.69 रूपये प्रतिलीटर)
बेंगलोर - पेट्रोल (100.17 रूपये प्रतिलीटर) , डीझेल (92.97 रूपये प्रतिलीटर)
कोलकाता - पेट्रोल (96.84 रूपये प्रतिलीटर) , डीझेल (90.54 रूपये प्रतिलीटर)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल, डिझेलचे दर इथे पहा.
आता तुम्हांला घरबसल्या देखील पेट्रोल, डीझेलचे दर पाहता येणार आहेत. त्यासाठी एसएमएस द्वारा अलर्ट्स मिळतात. मुंबईत इंडियन ऑईलच्या दरांसाठी तुम्हांला RSP 108412 हा (RSP <space>Dealer Code of Petrol Pump) या स्वरूपातील मेसेज 9224992249 वर पाठवायचा आहे. तुम्हांला ऑफिशिएअल वेबसाईट वर देखील मॅपच्या आधारे इंधनाचा दर पाहता येणार आहे.