Petrol, Diesel Price In India: केंद्र सरकार कडून इंधनदरात कपातीच्या घोषणेनंतर पहा आजचा पेट्रोल, डिझेलचा दर काय?
तर डिझेल 104.77 रूपये वरून 97.28 रूपये प्रतिलीटर करण्यात आली आहे.
भारतामध्ये वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल (Petrol Price), डिझेलच्या दरांमध्ये (Diesel Price) कपात करण्यात आली आहे. देशात आता डिझेल प्रतिलीटर 8.69 आणि पेट्रोल 7.05 रूपये प्रतिलीटर कमी करण्यात आला आहे. सरकारकडून एक्साईज ड्युटी, अबकरी कर कमी केल्याने ऑटो फ्युअलचे दर कमी केले आहेत. देशातील महागाईने मागील काही दिवसांत आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढले होते.
देशाची राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रूपयांवरून 96.72 रूपये झाली आहे. तर डिझेलची किंमत 96.67 वरून 89.62 रूपये झाली आहे.
मुंबई मध्ये पेट्रोलचे दर 120.51 वरून 111.35 रूपये झाले आहेत. तर डिझेल 104.77 रूपये वरून 97.28 रूपये प्रतिलीटर करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील व्हॅटचे दर यावर प्रत्येक जिल्ह्यातील अंतिम इंधन दर अवलंबून असतात. जाणून घ्या महाराष्ट्रातील आजच्या पेट्रोल किंमती, डिझेलच्या किंमती काय?
पेट्रोल कोलकाता मध्ये 106.03 रूपये पेट्रोल झाले आहे. चेन्नई मध्ये 102.63 रूपये झाले आहे. कोलकाता मध्ये डिझेलची किंमत 92.76 आणि चेन्नई मध्ये 94.24 रूपये झाला आहे.
आता केंद्र सरकार पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. नक्की वाचा: खुशखबर! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती होणार कमी; केंद्राकडून उत्पादन शुल्कात कपात, गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी जाहीर .
सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेलच्या दरांसोबत गॅस सिलेंडरच्या दरांमधूनही दिलासा मिळाला आहे, केंद्र सरकारने घेतला आहे. 12 सिलेंडरपर्यंत 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे 9 कोटी उज्ज्वला योजना धारकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास 6100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.