Petrol-Diesel Price in India: पेट्रोल-डिझेल दर आज स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या किमती
तर दिल्लीत डिझेल 93.17 रुपये प्रति लीटर आणि मुंबईत 101.03 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांची तुलना केली तर मुंबई शहरात पेट्रोल सर्वाधिक दरात विकले जात आहे.
पेट्रोल (Petrol) डिझेल दरांनी (Petrol-Diesel Price in India) गाठलेली शंभरी आता सर्वसामान्यांना नवी राहीली नाही. नवे हे आहे की त्यात दररोज रुपया रुपयांनी होणारी वाढ. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रुड (Brent Crude) पुन्हा एकदा 84 डॉलर प्रति बॅरल इतक्या पातळीवर पोहोचले आहे. अमेरिकी बेंचमार्क क्रूड (Crude) सुद्धा 80 डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहे. आज (12 ऑक्टोबर) देशभरातील इंधन दरात वाढ झाली नाही. परंतू पाठिमागील सात दिवसांत इंधन दरांच्या (Fuel Price) किमती इतक्या वाढल्या आहेत की त्याची दररोज दखल घ्यावी लागतेच.
भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या दरांनुसार आज पेट्रोल, डिझेल किमती स्थिर आहेत. ऑक्टोबर महिन्यातील आजचा दुसरा दिवस आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कोणतीही वाढ झाली नाही. या आधी 4 ऑक्टोबर रोजी इंधन तेल दरात स्थिरता पाहायला मिळाली होती. (हेही वाचा, Upcoming IPOs: भारतीय आयपीओ मार्केटमध्ये तेजी; MobiKwik पासून Paradeep Phosphates पर्यंत तुम्ही या Top 3 कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता)
भारतातील प्रमुख शहरांती इंधन दर (प्रति लिटर)
शहर पेट्रोल डीजल
दिल्ली 104.44 रुपये 93.17 रुपये
मुंबई 110.41 रुपये 101.03 रुपये
कोलकाता 105.05 रुपये 96.24 रुपये
चेन्नई 101.76 रुपये 97.56 रुपये
भोपाल 112.96 रुपये 102.25 रुपये
लखनऊ 101.43 रुपये 93.57 रुपये
पेटोलियम Marketing कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) अन्वये, दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आणि मुंबईमध्ये 110.41 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आरहे. तर दिल्लीत डिझेल 93.17 रुपये प्रति लीटर आणि मुंबईत 101.03 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांची तुलना केली तर मुंबई शहरात पेट्रोल सर्वाधिक दरात विकले जात आहे.