Petrol-Diesel Price Today: इंधन दरवाढ कायम; जाणून घ्या प्रमुख शहरांमधील आजच्या किंमती
पेट्रोल 35 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 25 पैसे प्रति लीटरने महागले आहे. या नव्या वाढीसह दिल्लीमध्ये पेट्रोल 98.46 रुपये प्रति लीटर तर डिझेल 88.90 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.
आज (रविवार, 27 जून) सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 35 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 25 पैसे प्रति लीटरने महागले आहे. या नव्या वाढीसह दिल्ली (Delhi) मध्ये पेट्रोल 98.46 रुपये प्रति लीटर तर डिझेल 88.90 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. काल अनेक शहरात पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली होती. आजच्या वाढीमुळे शंभरी पार केली आहे. पेट्रोलचे दर देशातील 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात 100 रुपयांहून अधिक आहेत. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, लद्दाख, बिहार, केरल आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे.
मुंबई मध्ये पेट्रोलचे दर 104.56 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.42 रुपये प्रति लीटर इतके आहेत. पटनामध्ये काल शंभरी गाठलेल्या पेट्रोलची किंमत आज 100.47 रुपये प्रति लीटर इतकी आहे. तर डिझेल 94.24 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. (जाणून घ्या कालच्या इंधनाच्या किंमती)
कोलकाता मध्ये पेट्रोल 98.30 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.75 रुपये प्रति लीटर ने मिळत आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 99.49 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 93.46 रुपये प्रति लीटर इतकी आहे. जयपूरमध्ये पेट्रोलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. तिथे 105.18 रुपये प्रति लीटर किंमतीने पेट्रोल विकले जात आहे. त्याचबरोबर डिझेलही 97.99 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.
दरम्यान, केवळ एसएमएस करुन तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑयल (IOCL)च्या कस्टमर RSP स्पेस तुमच्या शहराचे नाव RSP कोड लिहून 9224992249 नंबर वर पाठवा.