Petrol, Diesel Price In India Today: भारतामध्ये आज इंधनदरांमध्ये पुन्हा वाढ; पहा तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचा भाव

आज देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये 13 व्या वेळेस वाढ करण्यात आली आहे.

Petrol, Diesel Price In India Today: भारतामध्ये आज इंधनदरांमध्ये पुन्हा वाढ; पहा तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचा भाव
Photo Credit - PTI

पेट्रोल, डिझेलचे दर आज (24 जून) ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली आहे. काल दर स्थिर ठेवल्यानंतर आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. देशभरात आज 26 पैसे आणि 7 पैशांनी इंधनांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशातील मेट्रो सिटीज मध्ये आज पेट्रोल 26 पैशांनी आणि डिझेल 7 पैशांनी वधारले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजरात क्रुड ऑईलची किंमत वाढत असल्याने भारतातही इंधन दर वाढीचा भडका उडत आहे. सध्या इंटरनॅशनल क्रुड प्राईस ही $75 प्रति बॅरेल आहे.

मागील मार्च महिन्यात 5 राज्यातील विधानसभा निवडणूकींच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या पण पेट्रोल-डिझेलचे भाक स्थिर होते पण निवडणूक निकालानंतर आता पुन्हा इंधन दरवाढ सुरू झाली आहे. दरम्यान ही महिन्याभारतील 13 वी इंधनदरवाढ आहे.

मुंबई, दिल्ली, कोलकाता मधील इंधनदर

मुंबई - पेट्रोल (103.89 रूपये प्रतिलीटर) , डीझेल (95.79 रूपये प्रतिलीटर)

दिल्ली - पेट्रोल (97.76 रूपये प्रतिलीटर) , डीझेल ( 88.30 रूपये प्रतिलीटर)

चैन्नई - पेट्रोल (98.88 रूपये प्रतिलीटर) , डीझेल (92.89 रूपये प्रतिलीटर)

कोलकाता - पेट्रोल (97.63 रूपये प्रतिलीटर) , डीझेल (91.15 रूपये प्रतिलीटर)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोलडिझेलचे दर इथे पहा.

आता तुम्हांला घरबसल्या देखील पेट्रोल, डीझेलचे दर पाहता येणार आहेत. त्यासाठी एसएमएस द्वारा अलर्ट्स मिळतात. मुंबईत इंडियन ऑईलच्या दरांसाठी तुम्हांला RSP 108412 हा (RSP <space>Dealer Code of Petrol Pump) या स्वरूपातील मेसेज 9224992249 वर पाठवायचा आहे. तुम्हांला ऑफिशिएअल वेबसाईट वर देखील मॅपच्या आधारे इंधनाचा दर पाहता येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2021 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).