पेट्रोल डिझेल च्या दरात घसरण कायम; जाणून घ्या आजच्या इंधनाच्या किंमती

गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक नीचांक आहे. इंधन दर कपातीने दिल्लीत पेट्रोलचा भाव पाच महिन्याच्या नीचांकावर तर डिझेल दराने मागील सात महिन्यातील नीचांकी स्तर गाठला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

पेट्रोल डिझेलच्या दरात होणारी घसरण कायम असून आजही दरकपात पाहायला मिळत आहे. आज देशभरात पेट्रोल प्रति लीटर 16 ते 17 पैसे तर डिझेल 20 ते 22 पैशांनी स्वस्त झाले आहे. गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक नीचांक आहे. इंधन दर कपातीने दिल्लीत पेट्रोलचा भाव पाच महिन्याच्या नीचांकावर तर डिझेल दराने मागील सात महिन्यातील नीचांकी स्तर गाठला आहे. आजच्या दर कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर 77.60 रुपयांपर्यंत खाली आला आहे. डिझेल प्रति लीटर 67.98 रुपये झाले आहे.

तर नवी दिल्लीत पेट्रोलचा भाव 71.94 रुपये असून डिझेलचा दर 64.87 रुपये आहे. यामुळे पेट्रोलचा भाव पाच महिन्याच्या नीचांकावर तर डिझेल दराने मागील सात महिन्यातील नीचांकी स्तर गाठला आहे. खुशखबर! आता रेल्वे स्टेशनवर Health ATM ची सोय; अवघ्या 60 रुपयांमध्ये करा 16 आरोग्य तपासण्या

तसेच वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्यात पेट्रोलचा भाव 74.98 रुपये आणि डिझेल 67.19 रुपये आहे. चेन्नईतसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. आज चेन्नईत पेट्रोल दर 74.73 रुपये आणि डिझेल 68.50 रुपये आहे. ही फेब्रुवारी महिन्यातील सलग दुस-या आठवड्यात इंधन दरात कपात करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये नेमका फरक काय?

मुळात पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांचे आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे इंजिन वेगवेगळे असते. पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात. मुळात इंधनांच्या प्रकारात, डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते. तर पेट्रोल हे डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते.

पेट्रोल ऐवजी डिझेल भरले तर काय करावं?

आपल्या दुचाकी वाहनामध्ये तुम्ही जर चुकून पेट्रोल ऐवजी डिझेल भरले, तर त्वरित गाडीच्या इंधनाची टाकी रिकामी करा. त्यानंतर इंधनाचा पाईप आणि कार्बोरेटर स्वच्छ करावा. जर तुम्ही डिझेलवर दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुमची गाडी चालू होणार नाही. आणि चालू झालीच तरी इंजिनवर त्याचा जोर पडून इंजिनातून आवाज येण्यास सुरुवात होईल. इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर धूर देखील येणास सुरुवात होईल आणि गाडीचे गॅस्केट जळून जाईल. शेवटी गाडीचे इंजिन निकामी होऊ शकते.